विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर इंडिया आणि लक्षई लाइफ सायन्सेसने कोविड -19 च्या उपचारासाठी निक्लोसमाइड औषधाच्या‌‌ मानवी चाचण्या केल्या सुरू

Posted On: 06 JUN 2021 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2021

भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि लक्षई लाइफ सायन्सेस प्रा.लि. यांच्या सहकार्याने कोविड-19 च्या उपचारांसाठी कृमीविरोधी औषध निक्लोसॅमाइडच्या  दुसऱ्या टप्प्यातील  प्रत्यक्ष मानवी चाचण्यांची सुरूवात केली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड -19  रूग्णांच्या उपचारासाठी निक्लोसॅमाईडची कार्यक्षमता, सुरक्षितता यांचे मूल्यांकन करण्यासाठी या चाचण्या केल्या सुरू आहेत. पूर्वी निक्लोसॅमाईड वयस्क, तसेच मुलांमधील  कृमींच्या(टेपवर्म) संसर्गाच्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात असे. या औषधाची सुरक्षितता वेळोवेळी तपासली गेली असून वेगवेगळ्या प्रमाणात, विविध स्तरावर मानवी वापरासाठी ते सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे.

सीएसआयआरचे महासंचालक डॉ शेखर सी मांडे यांनी एसईसीच्या निक्लोसॅमाईड वापरून प्रत्यक्ष मानवी चाचण्या करण्यासंबंधित शिफारसीबद्दल आनंद व्यक्त केला, की हे औषध मूळ स्वरुपात (जेनेरीक) सर्वसाधारणपणे परवडणारे औषध असून  सहजपणे भारतात उपलब्ध आहे आणि म्हणूनच भारतातील जनतेसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाऊ शकेल.

सीएसआयआर-आयआयसीटी हैदराबादचे संचालक.डॉ श्रीवरी चंद्रशेखर यांनी या औषधांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की,या औषधातील महत्त्वाचा घटक ( ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट ,एपीआय) आय.आय.सी.टी. मध्ये विकसित केलेल्या सुधारित तंत्रज्ञानावर आधारित असून लक्षई लाइफ सायन्सेस तो बनवित आहे आणि प्रयोगशाळेतील या प्रभावी मानवी चाचण्यांमध्ये(क्लिनिकल ट्रायल) ही  ते सहभागी आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यास रूग्णांसाठी किफायतशीर  प्रभावी उपचारपद्धती प्रदान करणारा हा पर्याय ठरेल.

लक्षईचे मुख्य कार्यकारी अधिकारी,डॉ. राम उपाध्याय,यांनी सांगितले की,येत्या 8 ते 12 आठवड्यात हे काम पूर्ण होईल. भारतीय अभ्यासानुसार, क्लिनिकल चाचण्यांच्या  दरम्यान तयार केलेल्या क्लिनिकल पुराव्यांच्या आधारे, आपत्कालीन वापरासाठी अधिकृत मान्यता  मिळविली जाऊ शकते जेणेकरून कोविड -19 रूग्णांना उपचारांसाठी अधिक पर्याय उपलब्ध असतील.

 

M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1724934) Visitor Counter : 234