भूविज्ञान मंत्रालय

नैऋत्य मोसमी पाऊस  मध्य अरबी समुद्र, संपूर्ण  कर्नाटक किनारपट्टी, गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर कर्नाटकचा काही भाग , तेलंगणाचा काही भाग, आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात पुढे सरकला

Posted On: 05 JUN 2021 7:38PM by PIB Mumbai

 

भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार: (शनिवार 5 जून 2021, वेळ : भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी  :1630 , दुपारच्या 1430 च्या निरीक्षणाच्या आधारे)

अखिल भारतीय हवामान अंदाज

नैऋत्य मोसमी पाऊस 5 जून  2021 रोजी  मध्य अरबी समुद्र, संपूर्ण  कर्नाटक किनारपट्टी, गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर कर्नाटकचा काही भाग , तेलंगणाचा काही भाग, आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात सरकला आहे.

पुढील  24 तासांत नैऋत्य मोसमी पाऊस  मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा बहुतांश भाग, तेलंगणा, तामिळनाडूचा उर्वरित भागबंगालच्या उपसागराचा मध्य आणि ईशान्य कडील भागात सरकण्याची शक्यता आहे.

हरियाणा आणि लगतच्या वायव्य राजस्थानमध्ये चक्रीय अभिसरण समुद्रसपाटीच्या वर 2.1 किमी पर्यंत विस्तारित आहे.

कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर चक्रीय अभिसरण  समुद्र सपाटीपासून वर 4.5 कि.मी.पर्यंत विस्तारित आहे.

दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीपासून  दक्षिण केरळ किनारपट्टीपर्यंत समुद्रसपाटीवर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

श्रीलंका आणि त्याच्या आसपासच्या कोमोरिन परिसरावरील चक्रीय अभिसरण समुद्र  पातळीपेक्षा वर 3.1 किमी आणि 4.5 किमी कायम आहे.

अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया www.imd.gov.in  येथे भेट द्या किंवा  +911124631913,24643965,24629798 वर संपर्क साधा

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1724778) Visitor Counter : 147