सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
भारतातील वृद्धांच्या मदतीसाठी थावरचंद गहलोत उद्या SAGE(सीनियरकेअर एजिंग ग्रोथ इंजिन) उपक्रमाचा आणि एस.ए.जी.ई पोर्टलचा करणार प्रारंभ
Posted On:
03 JUN 2021 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2021
भारतात वेगाने वाढणाऱ्या वृद्ध लोकसंख्येच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने, सहकार्य आणि विश्वसनीय स्टार्ट-अपद्वारे वृद्धांची काळजी घेणारी उत्पादने आणि सेवांची “एकाच ठिकाणी उपलब्धता ” निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय उद्या सीनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन (एस.ए.जी.ई) या उपक्रमाचा आरंभ करणार आहे. थावरचंद गहलोत यांच्या हस्ते सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे या उपक्रमाचा प्रारंभ होईल. सेजचा भाग होण्यासाठी समर्पित पोर्टलच्या माध्यमातून स्टार्ट-अप्स अर्ज करू शकतात, उद्या या पोर्टलचे उद्घाटन होणार असून पोर्टलचे कार्यान्वयन 5 जून 2021 पासून सुरु होईल.
आरोग्य, गृहनिर्माण, देखभाल केंद्र, याशिवाय वित्त, अन्न आणि संपत्ती व्यवस्थापन आणि कायदेशीर मार्गदर्शन यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित तांत्रिक उपलब्धता प्रदान करण्यास सक्षम असणाऱ्या स्टार्ट-अपची निवड नावीन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांच्या आधारे केली जाईल. शिक्षण मंत्रालयाच्या ‘नीट’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रशेखर बुद्ध, आणि सहाय्यक नवोन्मेष संचालक डॉ. एलेंगोवान यांनी विक्रमी वेळेत एस.ए.जी.ई पोर्टल तयार केले आणि त्याला अंतिम स्वरूप दिले.
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724247)
Visitor Counter : 167