संरक्षण मंत्रालय
सैन्य शैक्षणिक कोअरचा 100 वा वर्धापनदिन भारतीय लष्कराकडून साजरा
Posted On:
01 JUN 2021 7:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2021
भारतीय लष्कराने, सैन्य शैक्षणिक कोअरचा (AEC) 100 वा वर्धापनदिन 1 जून 2021 रोजी साजरा केला. यावेळी मेजर जनरल देवेश गौर, अतिरिक्त महासंचालक सैन्य शिक्षण आणि कर्नल कमांडंट उपस्थित होते. एईसीने सैन्यदलाच्या सर्व विभागांच्यावतीने राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अपर्ण केले.
एईसीच्या इतिहासाला 1921 पासून सुरुवात होते. भारतीय जवांनामधे तेव्हा निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते. संघटनात्मक गरजा लक्षात घेऊन एईसीने या कालावधीत शैक्षणिक आणि तंत्रज्ञानात प्रगती व्हावी यासाठी उल्लेखनीय विकासात्मक कामे केली.
कोअर द्वारे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यात, कार्यालयीन सेवेचाही समावेश आहे उदाहरणार्थ, नकाशा वाचन प्रशिक्षण, नियुक्तीपूर्वीचे अकादमिक प्रशिक्षण, परदेशी भाषा शिकण्याचे क्षमता संवर्धन, लष्करी संगीत, माहितीचा अधिकार कायद्या संबंधित प्रकरणांची हाताळणी आणि देशभरातील राष्ट्रीय लष्करी शाळा आणि सैनिकी शाळांमधील तरुणांना घडवणे याचा समावेश आहे.

सैनिक, विभाग आणि संबंधितांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी इग्नू सैन्य शिक्षण प्रकल्प (IAEP) आणि एनआयओएस शिक्षण प्रकल्प तसेच भारतीय लष्करासाठी (NEPIA) यासारखे अनौपचारिक शैक्षणिक कार्यक्रम कोअर राबवत असते.
ज्ञानाचे आणि शिक्षणाचे क्षेत्र विस्तारत आहे. तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होतोय. अशात, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि संघटनात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी सैन्य शिक्षण कोअर सज्ज आहे.
* * *
M.Chopade/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723502)
Visitor Counter : 350