रेल्वे मंत्रालय

ऑक्सीजन एक्सप्रेसने 20,000 मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूच्या पुरवठ्याचा पार केला टप्पा


305 ऑक्सीजन एक्सप्रेसनीं देशभरात केला प्राणवायूचा पुरवठा

ऑक्सीजन एक्सप्रेसने आतापर्यंत 1237 टँकर्सच्या सहाय्याने द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू पोहचवून 15 राज्यांना दिला दिलासा

Posted On: 29 MAY 2021 7:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मे 2021

 

सर्व अडथळ्यांवर मात करत आणि नवे उपाय शोधत देशभरातील विविध राज्यात द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पोहचवण्याचा दिलासादायक प्रवास भारतीय रेल्वेने सुरुच ठेवला आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने 20770 मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू 1,237 पेक्षा अधिक टँकर्समधून देशातील विविध राज्यात पोहचवला आहे.

विविध राज्यांना दिलासा देत 305 ऑक्सीजन एक्सप्रेसनी आपला हा प्रवास केला आहे. हे पत्रक प्रसिद्ध होत असताना पर्यंत 6 ऑक्सीजन एक्सप्रेस 26 टँकर्समधून 420 मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू घेऊन प्रवास करत आहेत. 

आसाममधे आज तिसऱ्या ऑक्सीजन एक्सप्रेसमधून 4 टँकर्समधे 80 मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पोहचला. 

विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते की ऑक्सीजन एक्सप्रेसचा हा प्रवास 35 दिवसांपूर्वी 24 एप्रिल रोजी सुरु झाला. पहिल्या एक्सप्रेसमधून 126 मेट्रीक टन प्राणवायू महाराष्ट्रात पोहचवण्यात आला. 

ऑक्सीजन एक्सप्रेसच्या माध्यमातून  प्राणवायूचा दिलासा देण्यात आलेली 15 राज्ये पुढील प्रमाणे: उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र,मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम.

आतापर्यंत देशातील 15 राज्यांमधल्या 39 शहरांमधे ऑक्सीजन एक्सप्रेसनीं द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पोहचवला आहे. 

प्राणवायूची मदत शक्य तितक्या वेगाने पोहचवत ऑक्सीजन एक्सप्रेसच्या माध्यमातून रेल्वे नवे मापदंड आणि आदर्श रचत आहे. 

मालवाहतुकीच्या वेगावर कोणताही प्रतिकूल परिणाम न होता हे साध्य केले जात आहे. 

 

* * *

Jaydevi PS/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1722741) Visitor Counter : 189