संरक्षण मंत्रालय

ऑपरेशन समुद्र सेतु II च्या अंतर्गत आयएनएस त्रिकंद कोविड मदत सामग्री घेऊन मुंबईत दाखल

Posted On: 23 MAY 2021 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 मे 2021

 

सध्या सुरु असलेल्या कोविड मदत अभियान समुद्र सेतू II अंतर्गत कतार येथून कोविड मदत सामग्री घेऊन आयएनएस त्रिकंद हे जहाज 23 मे 21 रोजी  मुंबईत  दाखल झाले. आयएनएस  त्रिकंद या जहाजातून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचे (एलएमओ) प्रत्येकी 20 मेट्रीक टनचे दोन कंटेनर्स आणि 100 ऑक्सिजन सिलिंडर्स आणले आहेत.

  

कोविड-19 विरोधात देशातील सुरू असलेल्या लढ्यात महत्वाच्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा  वाढविण्यासाठी भारतीय नौदल तैनात आहे. तौते चक्रीवादळाच्या परिणामामुळे अरबी समुद्रात  P305 हा तराफा बुडल्याच्या पार्श्वभूमीवर, तेग, बेतवा, सुभद्रा, मकर, तारासा आणि त्वरित मदतीसाठीची 07 जहाजे याव्यतिरिक्त नौदलाची हेलिकॉप्टर्स आणि विमाने यांच्याकडून देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर मदत आणि बचाव कार्य अविरत सुरु आहे.

* * *

S.Thakur/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1721151) Visitor Counter : 249


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu