आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
“आंतरिक प्रकाशाचा शोध” मानसिक आरोग्य आणि महामारी या विषयावर वेबिनारचे आयोजन
आजाराची भीती हीच सर्वात जास्त चिंताजनक भावना, शोकाकुल व्यक्तींचे समुपदेशन अतिशय महत्त्वाचे, महामारीच्या काळात करुणा आणि सहानुभूतीची भावना आवश्यकः मानसिग आरोग्य तज्ञ
Posted On:
22 MAY 2021 7:25PM by PIB Mumbai
मुंबई, 22 मे 2021
एक समाज म्हणून करुणा आणि समजुतदारपणाची भावना वाढीला लावणे अतिशय महत्त्वाचे आहे. सर्वांनाच याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष झळ बसलेली असल्याने कोविड19 ही सार्वत्रिक समस्या आहे, असे मत “आंतरिक प्रकाशाचा शोध” मानसिक आरोग्य आणि महामारी या विषयावर आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये मानसिक आरोग्य तज्ञांनी व्यक्त केले. पत्र सूचना कार्यालय आणि महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्राच्या प्रादेशिक संपर्क विभागाने संयुक्तपणे या वेबिनारचे आयोजन केले होते. यामध्ये बंगळूरुच्या निमहॅन्स संस्थेमधील मानसशास्त्राच्या प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. प्रतिमा मूर्ती आणि याच संस्थेच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. ज्योत्स्ना अग्रवाल या तज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी झाल्या होत्या.
कोविड-19 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये निर्माण होऊ शकणाऱ्या मानसिक आरोग्यविषयक समस्या
या रुग्णांमध्ये सर्वात जास्त निर्माण होणारी भावना म्हणजे भीती, असे डॉ. मूर्ती यांनी सांगितले. या भीतीमध्ये विविध प्रकारच्या भीतीचा समावेश असतो. काय होणार आहे, मला रुग्णालयात बेड उपलब्ध होईल का, माझ्या फुफ्फुसांवर आणि इतर अवयवांवर काही परिणाम होईल का, अशा विविध प्रकारच्या प्रश्नांमुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली असते, असे मूर्ती म्हणाल्या. अशा वेळी आपण एक पाऊल मागे घेतले तर तर आपल्या लक्षात येते की प्रत्येक 100 माणसांमध्ये 85 लोकांना साधा ताप आणि इतर लक्षणे असतात आणि जी आपोआप बरी होतात आणि बहुतेक लोक यातून बरे होतात, याकडे मूर्ती यांनी लक्ष वेधले.
दुसरी गोष्ट म्हणजे इतकी जास्त माहिती पसरलेली आहे की काय करायचे याबाबतीत सुद्धा ती व्यक्ती गोंधळून जाते. त्यामुळे योग्य माहिती मिळणे ही तितकेच महत्त्वाचे आहे असे मानसिक आरोग्य तज्ञांनी सांगितले.
तिसरी बाब म्हणजे ज्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाते किंवा ती किंवा अतिदक्षता कक्षात दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांमध्येही एक प्रकारची अगतिकता किंवा आपण काहीच करू शकत नसल्याने असहाय्य असल्याची भावना निर्माण झालेली असते. अर्थातच जेव्हा तुम्ही कोविडमुळे एखाद्या व्यक्तीला गमावता तो काळ तर मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून अतिशय खडतर कालखंड असतो. या काळात तुम्ही अतिशय दुःखी आणि शोकाकुल असता. त्याशिवाय कोविड संसर्गानंतर निर्माण झालेल्या मानसिक आरोग्याच्या समस्याही असतात. त्यामध्ये अस्वस्थता आणि वैफल्याची भावना यांच्या जोडीला लॉन्ग कोविड म्हणून ओळखली जाणारी समस्या असू शकते. या स्थितीमध्ये लोकांना मेंदूमध्ये जडपणा वाटतो, त्यांना नीट विचार करता येत नाही, मज्जातंतूविषयक समस्यांची लक्षणे असतात, अशी माहिती मूर्ती यांनी दिली.
दुसरी एक समस्या म्हणजे लोकांमध्ये आपण नियंत्रण गमावल्याची भावना निर्माण होते, अशी माहिती डॉ. अग्रवाल यांनी दिली. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, त्यांना आर्थिक, भावनिक आणि इतर समस्या भेडसावत आहेत. अगदी घरी असताना सुद्धा त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकंदरच त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होत आहे की हे नक्की कोणत्या प्रकारचे आयुष्य आहे? त्याच प्रकारे अनेक लोकांच्या मनात स्वतःच्या अस्तित्वाविषयीचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांच्या मनातील विविध प्रकारच्या श्रद्धा आणि धारणा प्रणालीविषयी आणि त्यांनी व्यतीत केलेल्या आयुष्याबाबत त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. अशा प्रश्नांमुळे देखील लोकांमध्ये निराशा आणि जगापासून दुरावले जाणार असल्याची चिंता निर्माण होत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून ते काही चुकीची पावले उचलण्याची आणि त्यामुळे परिस्थिती आणखी वाईट होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे कोविडचा आरोग्यविषयक परिणाम खूपच प्रचंड आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.मानसिक आरोग्यविषयक समस्यांना तोंड देण्यासाठी केल्या जाणाऱ्या चुकीच्या उपाययोजनांबाबत डॉ. मूर्ती यांनी अधिक माहिती दिली. यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. दारु असो, तंबाखू असो वा अमली पदार्थ असोत. या पदार्थांचा वापर आणि व्यसनाधीनता वाढत आहे. महामारीच्या काळातील सर्वाधिक चिंताजनक बाबींपैकी ही एक बाब आहे.
कोविड19 मुळे ज्या लोकांना मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आणि तणावमुक्त करण्यासाठी समाज, समुदाय, मित्रपरिवार काय करू शकतो?
कोविड संसर्ग असलेले जे लोक आपल्या घराबाहेर पडू शकत नाहीत त्यांना मदत करण्याच्या प्रमुख उपायांपैकी एक उपाय म्हणजे आपण त्यांचे जेवण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आपण त्यांच्याशी विविध माध्यमातून सतत संपर्कात राहू, फोनद्वारे किंवा समाज माध्यमांद्वारे त्यांची माहिती घेत राहू याची काळजी घेतली पाहिजे. असे काही लोक आहेत जे लोक अंत्यविधीसाठी या कुटुंबांना मदत करत आहेत, जी कुटुंबे बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा त्यांचे आप्तस्वकीय नाहीत. लोक मदतीसाठी अनेक प्रकारे संपर्क करत आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला दिसत असलेल्या लोकांचे दुःख आणि वैफल्य कमी करता येऊ शकते. आपल्याकडे त्या व्यक्तीविषयी करुणा आणि तिचे दुःख समजून घेण्याची भावना असली पाहिजे, असे डॉ. मूर्ती यांनी सुचवले.
प्रभावित लोकांच्या महत्त्वाचा गटांपैकी एक म्हणजे आघाडीवर काम करणारे कर्मचारी असल्याचे डॉ. मूर्ती यांनी सांगितले. दररोज डोळ्यासमोर मृत्यू होताना पाहिल्यामुळे डॉक्टर आणि परिचारिकांना नैराश्य जाणवू शकते. पोलिस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, स्मशानभूमीत काम करणारे लोक देखील प्रचंड तणावाखाली आहेत. जेव्हा गोष्टी अपेक्षित मार्गाने होत नाहीत तेव्हा त्यांना शत्रुत्वाची भावना आणि हिंसा देखील सहन करावी लागू शकते. “त्या सर्वांना प्रचंड ताण सहन करावा लागत आहे. म्हणूनच, आपणही ते सर्व त्यांच्या क्षमतेनुसार पार पाडत असलेल्या भूमिकेची दखल घेणे आणि त्यासाठी त्यांना सहाय्य देखील करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी देखील त्यांना भरपूर समर्थन आवश्यक आहे. ”
अशा वेळी उपयुक्त ठरणाऱ्या आणखी एका दृष्टिकोनावर प्रकाश टाकत डॉ. अग्रवाल म्हणाले, अशा कठीण परिस्थितीत लोक समाजात कसे योगदान देता येईल या दृष्टिकोनातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व लक्षात घेतले पाहिजे. काही लोकांना समाजात मिसळण्यास आणि इतरांसाठी काहीतरी करायला अधिक सोयीस्कर वाटू शकते तर काहींना वैयक्तिक स्तरावर काम करण्याची इच्छा असू शकते. “आपण फक्त छोट्या गोष्टी उदा. एखाद्याकडे हसून पाहणे किंवा आजारी व्यक्तीला दूरध्वनी करून त्याची चौकशी करू शकतो. आपण सर्वजण आपले खास गुण इतर लोकांसाठी वापरू शकतो. उदाहरणार्थ, जर कोणी मुलांना ऑनलाइन एखादी कला आणि हस्तकला शिकवत असेल तर त्या मुलांच्या कुटुंबांना त्याचा खूप उपयोग आणि आनंद होऊ शकतो. आपण सर्जनशील असायला हवे , स्वतःशी दयाळू असायला हवे आणि इतर लोक जे करत आहेत त्याबद्दल त्यांची प्रशंसा करायला हवी. या दुःखद काळात सकारात्मक भावना किंवा आनंदाचे काही क्षण आणणे उपयुक्त ठरेल ”, असे मत मानसिक आरोग्य तज्ञानी व्यक्त केले.
मदत हवी असलेल्यांशी मदत करायची इच्छा असलेल्याना जोडणे
डॉ. मूर्ती म्हणाले, लोक एकटे नाहीत याबाबत जनजागृती होणे फार महत्वाचे आहे. असे काही लोक आहेत ज्यांना त्यांचे खासगी आयुष्य आवडते, म्हणून काही ते एकटे नसतात. मात्र सध्याच्या काळात एकटेपणा खूप त्रासदायक असू शकतो. लोकांनी हे समजून घेणे महत्वाचे आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणारे एक मदतीचे नेटवर्क आहे. दुसरीकडे, जे लोक अभिव्यक्त होत आहेत त्यांना हे माहित असले पाहिजे की ते स्वतःला कसे मदत करू शकतात तसेच मदतीसाठी कसे पोहोचू शकतात. “जोडलेले असणे आणि गोष्टी कोठे उपलब्ध आहेत हे माहित असणे खूप महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त, आपल्या सर्वांना हे माहित असणे गरजेचे आहे की आपण एकाकीपणा, नैराश्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दु:खाला कसे सामोरे जाऊ शकतो.
“या काळात मोठ्या प्रमाणावर दिसून आलेला चांगुलपणा आश्चर्यकारक आहे.” असे सकारात्मकपणे अग्रवाल म्हणाले. आपल्याला वेगळे ठेवलेले नाही हे सांगण्याची वेळ आली आहे आणि आपल्याला एकत्रितपणे या अडचणी येत आहेत आणि दुसऱ्यांकडून मदत घेणे आणि मदत करणे योग्य आहे हे लोकांना समजून घ्यावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.
कोविडमुळे कुटुंबांमध्ये उद्भवणाऱ्या मानसिक-आरोग्य समस्या
डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले की बरेच लोक जे घरून काम करतात त्यांच्या कामावेळा लांबलेल्या, कुटुंबासाठी नेमका किती वेळ दिला पाहिजे याबाबत लवचिकता नसते तर दुसरीकडे, मुले, वृद्ध आणि जोडीदार यांनाही वेळ हवा असल्यामुळे ते कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. याचा परिणाम असा तो की इतरांना आपल्याकडून किती अपेक्षा आहेत आणि इतरांच्या गरजा पूर्ण करता येतात यामुळे ते भारावून जातात. या काळात आपली स्पेस राखणे गरजेचे असते विशेषतः स्वतःकडे लक्ष देणे , केवळ शारीरिकच नाही तर भावनिक देखील हेही महत्वाचे आहे . या काळात सुसंवाद राखणे एक कठीण आव्हान असून सर्व लोकांनी त्यांच्या भावनिक आरोग्याची काळजी घेणे आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे.
डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले, “आता जेव्हा लोक बाहेर पडू शकत नाहीत, तेव्हा त्यांना ऑनलाईन पद्धतीने संपर्कात राहण्याची संधी आहे,ते एक असे संसाधन आहे जे योग्य रीतीने वापरले तर सोय आणि जोडलेले असण्याची भावना त्यातून निर्माण होईल. कुटुंबांना आता एकमेकांशी जोडलेले राहण्याची संधी लाभली आहे, जी यापूर्वी शक्य नव्हती. ”
डॉ. मूर्ती म्हणाले की, ही वेळ अशी आहे की कुटुंबातील सदस्य आपली कामे वाटून घेत आहेत आणि लहान मुले एकप्रकारे जबाबदारीने वागायला शिकत आहेत. तरीही या काळात संबंध ताणले जाऊन संघर्ष आणखी वाढू शकतात .
● आपण हे समजून घेतले पाहिजे की दु: ख ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्ती ती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करते. सुन्नपणा, नकार, संभ्रम, क्रोध, अपराधीपणा असेल, तो मोठ्या प्रमाणात असू ही शकतो मात्र त्याला सामोरे जाणे महत्वाचे आहे; परिस्थिती पूर्वपदावर आणणे देखील महत्त्वपूर्ण आहे. आपण अशा काळात आहोत ज्यात बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला आहे, या दुःखाबाबत समुपदेशन करणे आता फार महत्वाचे आहे, असे डॉ. मूर्ती यांनी नमूद केले.
Jaydevi PS/S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1720940)
Visitor Counter : 663