पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

तौते चक्रीवादळात ओएनजीसीची जहाजे अडकून पडण्यामागील घटनांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

Posted On: 19 MAY 2021 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2021

तौते चक्रीवादळात ओएनजीसीची जहाजे अडकून पडण्यामागील घटनांची चौकशी करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची अनेक जहाजे आणि त्यांवरील 600 होऊन अधिक लोक, तौते चक्रीवादळाच्या वेळी किनाऱ्याजवळील सागरी भागात अडकून पडले होते. अशा अडकण्यामुळे तसेच वाहून जाण्यामुळे व अन्य कारणांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

या समितीत जहाजबांधणी महासंचालक अमिताभ कुमार, हायड्रोकार्बन महासंचालक एस.सी.एल.दास आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव नाझली जाफरी शायीन यांचा समावेश असून, संबंधित घटनांची चौकशी ही समिती करणार आहे. गरज भासल्यास ही समिती आणखी काहींचा समावेश करून घेऊन त्यांचे सहकार्य घेऊ शकते. एका महिन्यात या समितीला अहवाल सादर करावयाचा आहे..

या समितीवरील जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे-:

  1. ही जहाजे अडकणे व वाहून जाणे याला कारणीभूत ठरलेल्या घटनाक्रमाची तसेच अन्य प्रसंगांची चौकशी करणे
  2. हवामानशास्त्र विभाग आणि अन्य वैधानिक अधिकरणांनी दिलेल्या पूर्वसूचना पुरेशा विचारात घेतल्या घेल्या होत्या का व त्यावर उचित कार्यवाही झाली होती का?- याची चौकशी करणे
  3. जहाजांच्या सुरक्षेशी संबंधित तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित एसओपी अर्थात प्रमाणित कार्यान्वयन प्रणालीचे योग्य पद्धतीने अनुसरण झाले होते का?- याची चौकशी करणे
  4. जहाजे अडकण्यास व वाहून जाण्यास कारणीभूत ठरलेल्या व्यवस्थेतील त्रुटी दाखवून देणे
  5. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिफारशी करणे

 

M.Chopade/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1720095) Visitor Counter : 172


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi