भूविज्ञान मंत्रालय

चक्रीवादळ “तौते ” ईशान्य दिशेने सरकण्याची आणि पुढच्या 12 तासांत हळूहळू त्याची तीव्रता कमी होऊन कमी दाब क्षेत्रात रुपांतरीत होण्याची शक्यता , पुढील दोन दिवसांत राजस्थानच्या ईशान्य दिशेकडे आणखी सरकून पश्चिम उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता

Posted On: 19 MAY 2021 8:57AM by PIB Mumbai

भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार (आयएमडी): (सूचना जारी केल्याची  वेळ:सकाळी 7. 45), दिनांक: : 19.05.2021 

गुजरात प्रदेशावरील कमी दाबाचा पट्टा  गेल्या सहा तासात  ताशी सुमारे 7 किमी वेगाने ईशान्येकडे  सरकला असून त्याची तीव्रता कमी झाली आहे.  आज    दक्षिण राजस्थान आणि त्यालगतच्या गुजरात प्रदेशात त्याचे केंद्र असून  उदयपूर (राजस्थान) च्या पश्चिम-नैऋत्येकडे  60 किमी अंतरावर आणि दिसा (गुजरात प्रदेश) च्या 110 किमी पूर्व-ईशान्य दिशेला आहे. पुढील 12 तासांत हे वादळ ईशान्येकडे सरकण्याची आणि हळू हळू कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे.  पुढील दोन दिवसांत ते  राजस्थानच्या उत्तर-पूर्व.दिशेने पश्चिम उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता आहे.

इशारा

(i)   पाऊस

आज पूर्व राजस्थानात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासह बहुतांश भागात  हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

काराकोरम रांगा ओलांडून येणारे वारे(Western Disturbance) आणि उर्वरित कमी दाबाच्या पट्टा यांच्यातील संयोगामुळे बहुतेक ठिकाणी मुसळधार ते फार जास्त मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर  उत्तराखंडमध्ये तुरळक ठिकाणी  अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंडीगड आणि दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि  पंजाब, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये पुढील  24  तासात अतिवृष्टीचा अंदाज आहे.

 

ii) वाऱ्याचा वेग

पूर्व  राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या गुजरात प्रदेशात पुढील 12 तासांत ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

(ग्राफिक्समधील तपशीलांसाठी कृपया येथे क्लिक करा)

***

Jaydevi PS/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719835) Visitor Counter : 147


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil