भूविज्ञान मंत्रालय
गोवा आणि कोकणातील तुरळक ठिकाणी 15 मे रोजी वीजा आणि वादळी वाऱ्यासह ( 30-40 किमी प्रतितास) पावसाची शक्यता
गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा), काही ठिकाणी 18 मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता
Posted On:
14 MAY 2021 11:15AM by PIB Mumbai
भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला. तो पुढीलप्रमाणे
14 मे: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकच्या सागरी भागात काही ठिकाणी वीजा आणि वादळी वाऱ्यासह (40-50 किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता आहे.
15 मे: गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता.
गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
16 मे: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा), मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता.
गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर 50-60 किमी प्रतितास ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
17 मे: गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
18 मे: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर 40-50 प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असणण्याची शक्यता.
*****
S.Tupe/S.Thakur/C.Yadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718534)
Visitor Counter : 139