उपराष्ट्रपती कार्यालय

ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींकडून देशातील जनतेला शुभेच्छा

Posted On: 13 MAY 2021 4:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2021

 

ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा संदेश पुढीलप्रमाणे-

ईद-उल-फित्रच्या आनंददायी प्रसंगी मी देशवासीयांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

ईद-उल-फित्र हा सण  रमजानचा  पवित्र महिना संपल्यानंतर साजरा केला जातो आणि तो  सामुदायिक बंधुभाव आणि  एकजुटतेचे  प्रतीक आहे. हा सण आपल्या जीवनात  करूणा, परोपकार आणि औदार्याची भावना आणि  महत्व  अधिक बळकट करतो.

आपल्या देशात सणाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब आणि मित्रमंडळी एकत्र येऊन आनंद साजरा करतात. मात्र  कोविड-19  महामारीमुळे द्‌भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मी देशवासियांना कोविड संबंधी आरोग्य आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत हा सण साजरा करण्याचे आवाहन करतो.

 ईद-उल-फित्रशी संबंधित महान आदर्श मूल्ये आपल्या जीवनात शांतता, एकता आणि  मानवतेची भावना समृद्ध करो अशी मी प्रार्थना करतो.

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718304) Visitor Counter : 159