जलशक्ती मंत्रालय
कोणीही वंचित राहणार नाही’ हे सुनिश्चित करण्यासाठी 90% पेक्षा जास्त व्याप्ती असलेल्या खेड्यांमध्ये नळ जोडण्यांना प्राधान्य देण्याची केंद्र सरकारची राज्य / केंद्र शासित प्रदेशांना सूचना
Posted On:
12 MAY 2021 8:48PM by PIB Mumbai
जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या (डीडीडब्ल्यूएस) राष्ट्रीय जल जीवन मिशन (एनजेजेएम) ने राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 90% पेक्षा जास्त नळजोडण्या देण्यात आलेल्या खेड्यांमधील उर्वरित कुटुंबांना प्राधान्याने नळ जोडणी देण्याची सूचना केली आहे. समानता आणि सर्वसमावेशकतेच्या तत्त्वानुसार जल जीवन मिशन (जेजेएम) अंतर्गत गावातील ‘सर्व कुटुंबाना’ नळाद्वारे पेयजल उपलब्ध करुन देण्याची विनंती राज्यांना करण्यात आली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नियमित आणि दीर्घ मुदतीच्या आधारे विहित गुणवत्तेचा नळाद्वारे पुरेसा पाणी पुरवठा करायचा आहे. आणि “कोणीही वंचित राहणार नाही” याची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक गावाला ‘हर घर जल’ गाव बनवणे हे ध्येय असल्याची आठवण यावेळी करून देण्यात आली. कारण यातून समानतेचा आणि सर्वसमावेशकतेचा दृष्टीकोन दिसून येतो. तसेच या घरांमध्ये नळजोडणी दिल्यामुळे राज्ये / केंद्रशासित प्रदेशामध्ये ‘हर घर जल’ गावांची संख्याही सुधारेल.
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 21,000 हून अधिक गावे आहेत जिथे उर्वरित 10% घरांना अद्याप घरगुती नळ जोडण्या दिलेल्या नाहीत . विद्यमान पेयजल पुरवठा प्रणालीचे विस्ताराचे काम हाती घेऊन या घरांना सहजपणे नळ जोडण्या देण्याला प्राधान्य दिले जाऊ शकते आणि या महिन्याच्या अखेरीस या 100% उद्दिष्टाची पूर्ती सुनिश्चित होऊ शकते. या प्रश्नी नियमितपणे आढावा घेतला जाईल.
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718142)
Visitor Counter : 144