ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
2021-22 च्या विद्यमान रब्बी विपणन हंगामातील गहू खरेदीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील गहू खरेदीच्या तुलनेत 49% वाढ
प्रविष्टि तिथि:
07 MAY 2021 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2021
देशातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंडीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात, जम्मू-काश्मीर आणि बिहार या गहू उत्पादक राज्यांमध्ये किमान आधारभूत किंमतीने या वर्षीच्या म्हणजे 2021-22 च्या रब्बी विपणन हंगामातील गहू खरेदी आधीच्या हंगामाप्रमाणेच सुरळीतपणे सुरु आहे आणि आतापर्यंत (6 मे 2021 पर्यंत) 323.67 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 216.01 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली होती. सध्याच्या रब्बी विपणन हंगामात आतापर्यंत 32 लाख 21 हजार शेतकऱ्यांचा गहू किमान आधारभूत किंमतीने विकत घेण्यात आला असून त्यापोटी शेतकऱ्यांना 63,924.56 कोटी रुपये चुकते करण्यात आले आहेत.


तसेच, राज्यांकडून आलेल्या प्रस्तावावर आधारित, खरीप विपणन हंगाम 2020-21 आणि रब्बी विपणन हंगाम 2021 साठी महाराष्ट्रासह विविध राज्यांना किमान आधारभूत किंमतीने 107.31 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.



6 मे 2021पर्यंत नोडल संस्थांच्या माध्यमातून सरकारने 3,358.97 कोटी रुपये किमान आधारभूत मूल्याने 6,41,251.32 मेट्रिक टन मूग, उडीद, तूर, मसूर, भुईमुग, मोहरी आणि सोयाबीन खरेदी केले आहे. यातून महाराष्ट्रासह विविध राज्यातील 3,98,877 शेतकऱ्यांना खरीप 2020-21 आणि रब्बी 2021 च्या हंगामात फायदा झाला आहे.


M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1716942)
आगंतुक पटल : 293