संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदलाचे कोविड-19 विषयक मदतीसाठी विशेष ऑपरेशन; नऊ युद्धनौका परदेशातून ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे आणण्याच्या कामात सहभागी

Posted On: 05 MAY 2021 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2021

 

कोविड-19 महामारीविरोधात सुरु असलेल्या लढ्यात राष्ट्रीय स्तरावरच्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या हेतूने, भारतीय नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू-2’ सुरु केले आहे. या अंतर्गत, नौदलाच्या तिन्ही विभागातून म्हणजेच मुंबई, विशाखापट्टणम आणि कोचि येथून भारताच्या युद्धनौका रवाना झाल्या आहेत. या नौकांमधून विविध मित्र राष्ट्रांकडून समुद्रमार्गे सध्या भारतात अत्यंत आवश्यक असलेले ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साधने आणली जात जात आहेत. 

पश्चिम समुद्रमार्गे आज दुपारी भारताची युद्धनौका आयएनएस तलवार बाहरीन इथून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टॅंक घेऊन, भारतात कर्नाटकच्या न्यू मंगलोर पोर्टच्या धक्क्यावर पोहोचली. 

त्याशिवाय,आयएनएस कोलकाता कुवैतहून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टॅंक घेऊन, 400 ऑक्सिजन युक्त सिलेंडर्स, 47 काँसंट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय साधने घेऊन भारताकडे रवाना झाल्या आहेत. या सोबतच, आणखी चार युद्धनौका कुवैत तसेच कतार येथून 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे टॅंक आणि 1500 पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन येणार आहेत.

पूर्व समुद्रमार्गाने भारताची युद्धनौका आयएनएस ऐरावत सिंगापूरहून 3000 पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स, 27 टन द्रवरूप ऑक्सिजनचे आठ टॅंक (216 टन), 10000 रैपिड अँटीजेन टेस्ट कीट्स आणि 7 काँसंट्रेटर्स घेऊन भारताकडे रवाना झाली आहे. तसेच आयएनएस जलाश्व ही युद्धनौका सध्या नैऋत्य आशियात तैनात असून, परिस्थितीनुसार गरज भासल्यास, तिलाही त्या प्रदेशातील बंदरावर पाठवले जाऊ शकते.

आयएनएस शार्दूल, ही कोचिच्या तळावरील युद्धनौका देखील आखाती देशांतून तीन द्रवरूप ऑक्सिजन भरलेले क्रायोजनिक कंटेनर्स घेऊन येत आहे. आयएनएस जलाश्व आणि आयएनएस शार्दूल यांनी गेल्यावर्षीच्या समुद्र सेतू अभियानात देखील सहभाग घेतला होता.

गेल्या वर्षी नौदलाने जसे समुद्र सेतू अभियान राबवून हिंद महासागर प्रदेशातल्या- IOR देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले होते, तशाच प्रकारे, भारतीय नौदल आजही देशाच्या या लढ्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716350) Visitor Counter : 184


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi