माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेचा रविवार 2 मे 2021 रोजी 10 वा दीक्षांत समारोह संपन्न
प्रविष्टि तिथि:
02 MAY 2021 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2021
सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेने रविवार, 2 मे 2021 रोजी आभासी पद्धतीने दीक्षांत समारंभाचे आयोजन केले होते. दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याचा प्रारंभही या दिवशी झाला. “सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था राष्ट्रासाठी नवीन चित्रपट निर्माते तयार करते म्हणून हा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे,” असे संस्थेचे प्रभारी संचालक प्राध्यापक अमरेश चक्रवर्ती म्हणाले.
चित्रपट विभागाच्या तेराव्या तुकडीचे पदवीधर, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया विभागाची पहिली तुकडी आणि अॅनिमेशन सिनेमाची पहिली तुकडी यांना विविध कौशल्ये आत्मसात केल्यावर तसेच त्यांचा पहिला चित्रपट यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर पदव्युत्तर डिप्लोमा प्रमाणपत्र मिळते.
रे यांच्या चित्रपट निर्मितीच्या शैलीतील साधेपणा आणि सरलता या तरुण चित्रपट निर्मात्यांना सुरुवातीच्या कामातूनच दिसून येते . अॅनिमेशन सिनेमाचे सहा चित्रपट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया विभागाचे पाच चित्रपट आणि चित्रपट विभागातील दहा चित्रपट अशा संस्थेद्वारे चालू आणि निर्मित, एकूण एकवीस शोध प्रबंध चित्रपट आणि त्यांचे विद्यार्थी यांना गौरविण्यात आले. यामधील शरण वेणुगोपाल यांच्या शोध प्रबंधासारखा चित्रपट मिडनाइट ड्रीम (ओरू पाठिरा स्वप्नम पोले) याला अलीकडेच 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये भारत सरकारच्या फिल्म फेस्टिव्हल्स संचालनालयातर्फे कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या समारंभाच्या प्रमुख अतिथी, सुप्रसिद्ध अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त अपर्णा सेन यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना सिनेमा आणि संबंधित ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातील विविध विषयांमधील औपचारिक शिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
दिग्गज चित्रपटाचे महान अभिनेते सत्यजित रे यांच्या नावे सुरु झालेली, ही संस्था सिनेमॅटिक आणि टेलिव्हिजन अभ्यासामध्ये पदव्युत्तर प्रशिक्षण देणारे उत्कृष्टता केंद्र म्हणून उदयास आली आहे.
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1715557)
आगंतुक पटल : 261