ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

महत्वपूर्ण वैद्यकीय उपकरणांच्या वेगवान आयातीसाठी सरकारने मापनशास्त्र अंतर्गत (पॅकेजिंग नियम 2011) मंजुरीसाठीच्या अटी शिथिल केल्या

Posted On: 30 APR 2021 8:11PM by PIB Mumbai

 

कोविड-19 ची सध्याची परिस्थिती लक्षात घेता आणि वैद्यकीय उपकरणांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने वैद्यकीय उपकरणांची आयात करणाऱ्या आयातदारांना 28 एप्रिल 2021 पासून तीन महिन्यांकरिता खालील श्रेणीतील वैद्यकीय उपकरणांची आयात करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी आयातदार आवश्यक असणारी सर्व घोषणापत्रे स्टॅम्पिंग किंवा स्टीकर चिकटवून किंवा ऑनलाईन प्रिंटींग करून आयात/जकात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि विक्रीपूर्वी लगेच सादर करतील ही अट ठेवण्यात आली आहे.

यात नेब्युलायझर्स, ऑक्सिजन संहनित्र, ऑक्सिजन जनरेटर आणि इतर उपकरणांचा समावेश आहे.

देशात आलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेत वर नमूद केलेली सर्व उपकरणे जलद उपलब्ध होऊन या वैद्यकीय उपकरणांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या सल्ले-सूचना जारी केल्या आहेत. या जीवनरक्षक उपकरणांना जलद मंजूरी मिळावी यासाठी केंद्र सरकारने या आवश्यक उपकरणांची जकात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परंतु विक्री आधी या उपकरणांवर लेबल लावण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. आयातकर्त्यांनी, या परवानगी अंतर्गत वैद्यकीय उपकरणे आयात केल्यावर, आयात झाल्यानंतर ताबडतोब, आयात केल्या जाणार्‍या राज्यातील संचालक (कायदेशीर मेट्रोलॉजी) आणि नियंत्रक (कायदेशीर मेट्रोलॉजी) यांना आयात केलेल्या सर्व उपकरणांची माहिती द्यावी.

 

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715176) Visitor Counter : 140