दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

एनटीआयपीआरआयटी चे इस्त्रो आणि दूरसंवाद क्षेत्रासोबत संयुक्तपणे “NavIC- दूरसंवाद उद्योगांसाठीच्या संधी” या विषयावर वेबिनार

Posted On: 28 APR 2021 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 एप्रिल 2021

एनटीआयपीआरआयटी-धोरण संशोधन, नवोन्मेष आणि प्रशिक्षण विषयक राष्ट्रीय दूरसंवाद संस्था ह्या केंद्र सरकारच्या दूरसंवाद विभागाच्या अखत्यारीतील सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेने 28 एप्रिल 2021 रोजी NavIC- दूरसंवाद उद्योगांसाठीच्या संधी या विषयावर वेबिनार आयोजित केले होते. इस्त्रो आणि दूरसंचार उद्योगांच्या सहकार्याने हे वेबिनार आयोजित करण्यात आले होते.

यावेळी इस्त्रोचे वैज्ञानिक सचिव, आर उमामहेश्वरन यांनी यावेळी NaviC (नाविक) प्रणाली विषयीची माहिती सांगितली आणि इतर दिशादर्शक प्रणालींच्या तुलनेत या प्रणालीची अचूकता अधिक असल्याचेही  त्यांनी सांगितले. 

केंद्रीय दूरसंवाद सचिव अंशू प्रकाश यांनी या वेबिनारचे उद्घाटन करतांना तंत्रज्ञानाचा वापर अॅपसाठी करून, तंत्रज्ञानाचे अधिकाधिक लाभ समाजापर्यंत पोचवण्याचे महत्त्व यावेळी सांगितले. NaviC (नाविक) प्रणाली भारतातल्या सर्व मोबाईल फोन्स मध्ये अनिवार्य केली जावी, या उमामहेश्वरन यांच्या मताला त्यांनी दुजोरा दिला. सध्याच्या कोविड काळात ऑक्सिजन टँकर्स आणि इतर महत्वाच्या वस्तूंच्या पुरवठ्याचा माग घेण्यासाठी देखील ही प्रणाली उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

NaviC विषयी माहिती:

NavIC ही एक इस्त्रोने स्थापन केलेली आणि इस्त्रोद्वारे चालवली जाणारी स्वायत्त प्रादेशिक उपग्रह दिशादर्शक प्रणाली आहे. या प्रणालीअंतर्गत भारत आणि भारतीय उपखंड परिसरातील 1,500 किमीचा परीघ येतो. ही प्रणाली आपल्या लोकेशनविषयी 20 एम पेक्षा अधिक अचूक माहिती देण्यास तसेच वेळेविषयी 50 ns (20) अचूक आहे.

नाविक प्रणालीवर आधारित अॅप्स अनेक क्षेत्रात वापरली जातात. यात वाहतूक , नकाशा दर्शवणारी अॅप्स, वेळ दर्शवणारी अॅप्स इत्यादी. आज अनेक मोबाईल कंपन्या देखील या प्रणालीचा वापर करतात. शाओमीचे रेडमी नोट- 9 चे मोबाईल फोन्स, रियल मी चे 6 सिरीजचे फोन आणि वन प्लस नॉर्ड या मोबाईल फोन्स मध्ये NavlC च्या मदतीने दिशादर्शन केले जाते.

NavlC ही भारतात विकसित झालेली दिशादर्शक प्रणाली असून, तिचे संपूर्ण नियंत्रणही भारतातच आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत ही प्रणाली सेवा रद्द केली किंवा नाकारली जाण्याची कुठलीही भीती नाही.

 

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1714716) Visitor Counter : 180


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil