आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण-99 वा दिवस


भारताने ओलांडला 14 कोटी कोविड-19 लसीकरण मात्रांचा टप्पा

भारत हा सर्वाधिक म्हणजे 14 कोटी मात्रांचे जलद नियोजन करणारा देश

गेल्या 24 तासात 24 लाखांहून अधिक मात्रा दिल्या गेल्या

Posted On: 24 APR 2021 10:10PM by PIB Mumbai

 

केवळ 99 दिवसांमध्ये 14 कोटी लसींच्या मात्रांचे नियोजन करत भारत हा लसीकरणाच्या बाबतीत सर्वात वेगवान देश ठरला आहे. देशभरात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत आज रात्री आठ वाजेपर्यंत 24 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

आज रात्री 8 वाजेपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, आजपर्यंत एकूण 14,08,02,794  लाख लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

यामध्ये, 92,89,621 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा आणि  59,94,401   आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी  मात्रा देण्यात आली आहे. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी 1,19,42,233  जणांना पहिली मात्रा, तर 62,77,797 जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 45 ते 60 वर्षे वयोगटातील 4,76,41,992 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 23,22,480 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 4,96,32,245 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 77,02,025 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

 

HCWs

FLWs

Age Group 45-60 years

Above 60 Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

92,89,621

59,94,401

1,19,42,233

62,77,797

4,76,41,992

23,22,480

4,96,32,245

77,02,025

11,85,06,091

2,22,96,703

आज लसीकरण मोहिमेच्या 99व्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत लसींच्या  24,22,989 मात्रा देण्यात आल्या. तात्पुरत्या अहवालानुसार यापैकी 15,69,631 लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 8,53,358 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. आज रात्री उशीरापर्यंत अंतिम अहवाल हाती येईल.

 

Date: 24th April 2021 (99th Day)

HCWs

FLWs

Age Group 45-60 ears

Above 60

Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

21,611

43,325

90,588

82,946

9,70,452

1,90,400

4,86,980

5,36,687

15,69,631

8,53,358

***

S.Thakur/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713868) Visitor Counter : 125


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi