रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली रोड-ट्रेन साठी मानकांचा मसुदा प्रकाशित केला
प्रविष्टि तिथि:
23 APR 2021 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2021
मालवाहतूक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी आणि एकंदर लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी, स्वयंचलित वाहन उद्योग मानक समितीने (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स समिती) रोड-ट्रेनच्या सुरक्षाविषयक आवश्यकतांचा समावेश करण्यासाठी आपल्या एआयएस -113 मानकात सुधारणा केली असून त्याचा सुधारित मसुदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स समितीमध्ये संबंधित मंत्रालये, चाचणी संस्था , उद्योग भागीदार, बीआयएस इत्यादींच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

भारतीय परिचालन स्थिती लक्षात घेऊन युरोपियन मापदंडांची तपासणी केल्यानंतर ही मानके तयार केली आहेत.
या मानकांमुळे लांब पल्ल्याच्या मालवाहतूक (फ्रेट) मार्गिकांवर वेगवान आणि कार्यक्षम मालवाहतुकीचा मार्ग मोकळा होईल.
रोड-ट्रेन एक मोटर वाहन आहे ज्यात ट्रेलर किंवा सेमी ट्रेलरच्या साखळीला जोडलेल्या एका पुलर वाहनाद्वारे ही संपूर्ण साखळी रस्त्यावर ट्रेनप्रमाणे धावू लागते.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, इंधन बचतीसाठी आणि ध्वनी व वायू प्रदूषण कमी करण्यासाठी निवडक मार्गांवर ही वाहने चालवली जातील.

* * *
S.Patil/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1713676)
आगंतुक पटल : 248