अर्थ मंत्रालय

कोविड-19 महामारीविरुद्धच्या लढाईत रूग्णांना मदत करण्यासाठी राज्ये, रुग्णालये आणि ऑक्सिजन तसेच लस उत्पादकांशी सुयोग्य समन्वय साधत, केंद्र सरकार अविरत काम करत आहे-अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Posted On: 22 APR 2021 9:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2021

देशभरात कोविडची दुसारी लाट आली असून, कोविड-19 महामारीचा सामना करणाऱ्या सर्व रुग्णांना ऑक्सिजन, लस आणि इतर सर्व मदत वेळेत मिळावी, याकडे केंद्र सरकार संपूर्ण लक्ष देत आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. PHD चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या आभासी सत्रात त्या आज बोलत होत्या.

केंद्र सरकार सर्व परिस्थितीकडे  नियमितपणे आणि बारकाईने लक्ष ठेवून आहे तसेच, राज्ये, रुग्णालये आणि ऑक्सिजन व लस पुरवठादारांच्या सातत्याने संपर्कात असून, सर्व घटकांशी समन्वय साधत, गरजू रूग्णांना सर्व सुविधा आणि उपचार मिळतील, यासाठी अविरत काम करत आहे, अशी माहिती सीतारमण यांनी दिली.

पंतप्रधान स्वतः सर्व परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत तसेच प्रमुख डॉक्टर्स आणि लस उत्पादकांशी त्यांची चर्चाही सुरु आहे.आंतरराष्ट्रीय संस्थांनी प्रमाणित केलेली लस भारतात आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने लस उत्पादकांना आगावू रक्कम देऊन त्यांनाही लस उत्पादनासाठी पाठींबा दिला आहे. आता एक मे पासून लसीकरण मोहीम व्यापक करत, 18 वर्षांवरील सर्व वयाच्या व्यक्तींना लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

रेमडेसीवीर इंजेक्शनची उपलब्धता वाढवण्याबाबत काही घोषणा सरकारने केल्या आणि त्यावरील सीमाशुल्क देखील रद्द करण्यात आले आहे. तसेच निर्यात केला जाणारा मालही थांबवण्यात आला असून, देशात रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सीतारमण यांनी  दिली.

 

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713482) Visitor Counter : 128


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu