नागरी उड्डाण मंत्रालय

ड्रोनद्वारे कोविड-19 लस पुरवठा करण्याची व्यवहार्यता अभ्यासण्याची आयसीएमआरला परवानगी

Posted On: 22 APR 2021 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2021

 

हवाई वाहतूक मंत्रालय (MoCA) आणि हवाई वाहतूक संचालनालयाने (DGCA) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (ICMR) आयआयटी कानपूरच्या सहयोगाने कोविड 19 लस पुरवठा ड्रोनच्या माध्यमातून करण्याच्या व्यवहार्यता तपासण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी एक वर्षासाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत असेल.

याव्यतिरिक्त, याच कारणासाठी ड्रोनचा वापर करण्यासाठी खालील संस्थांना पुढील आदेश येईपर्यंत परवानगी देण्यात आली आहे:

  • डेहराडून, हल्दवानी, हरीद्वार आणि रुद्रपूर नगर परिषदांना जीआयएस आधारीत संपत्ती विवरण आणि इलेक्ट्रॉनिक कर.
  • पश्चिम मध्ये रेल्वे,(WCR) कोटा यांना रेल्वे अपघात स्थळ आणि रेल्वे संपत्तीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी.
  • पश्चिम मध्य रेल्वे, (WCR) कतनी यांना रेल्वे अपघात स्थळ आणि रेल्वे संपत्तीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी.

 याशिवाय वेदांता लि. (केर्न तेल & वायू) यांनाही मालमत्ता तपासणी आणि मॅपिंगसाठी 08/04/2022 पर्यंत सशर्त परवानगी दिली आहे.

 

S.Thakur/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713464) Visitor Counter : 190


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu