वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली विविध निर्यात मंडळाची बैठक संपन्न
Posted On:
20 APR 2021 7:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2021
केंद्रीय रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था खात्याचे मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध निर्यात मंडळाची बैठक पार पडली. उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री हरदीप पुरी यांची या बैठकीला उपस्थिती होती. गेल्या वर्षभरातली विविध निर्यात मंडळासोबतची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची ही 12 वी बैठक होती.
पीयूष गोयल यांनी अतिशय कठीण काळातही दृढतेने कार्य केल्याबद्दल निर्यातदारांच्या कामगिरीची प्रशंसा केली. ते म्हणाले, 2020-21 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत पुरवठा साखळीत अडथळे असून, अनिश्चितता, टाळेबंदी, कोविड वर्षात अनेक ऑर्डर रद्द करुन गेल्या वर्षीच्या तुलनेत 7% कपात झाली. एकंदर परिस्थिती पाहता, ही अतिशय उत्तम कामगिरी असल्याचे ते म्हणाले. मार्च 2021 मधील निर्यात आकडेवारीतून दिसून येते की, निर्यात क्षेत्र मजबूत पुनर्प्राप्ती करत आहे. मार्च 2021 मध्ये मार्च 2020 च्या तुलनेत 60.29% वाढ झाली आहे.
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713046)
Visitor Counter : 247