राष्ट्रपती कार्यालय

राम नवमी निमित्त राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 20 APR 2021 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 एप्रिल 2021

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राम नवमीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात  म्हटले आहे:-

“राम नवमीच्या शुभ प्रसंगी मी देशातील सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.

भगवान श्री राम यांचा जन्मदिन  राम नवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. न्याय आणि मानवी प्रतिष्ठेसाठी प्रयत्न करत असताना आपल्याला मर्यादा  पुरुषोत्तम श्री राम यांच्या आदर्शांमधून  मोठे बळ मिळते.  भगवान श्री राम यांनी आपल्याला धर्मानुसार जीवन कसे जगावे हे शिकवले. त्यांचे संपूर्ण जीवन आणि सदाचार, सत्यनिष्ठा आणि संयम या त्यांच्या शिकवणुकीतून आपल्याला प्रेरणा मिळते.

या निमित्ताने आपण भगवान राम यांची  आदर्श मूल्ये आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी आणि एक वैभवशाली  भारत घडविण्याच्या दिशेने  एकत्रितपणे प्रयत्न करू या.”

राष्‍ट्रपतींच्‍या हिंदी संदेश वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा


* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713040) Visitor Counter : 170