भारतीय स्पर्धा आयोग

भारतीय स्पर्धात्मकता आयोग आणि ब्राझीलची आर्थिक संरक्षण प्रशासकीय परिषद यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 20 APR 2021 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत भारतीय स्पर्धात्मकता आयोग, सीसीआय  आणि ब्राझीलची आर्थिक संरक्षण प्रशासकीय परिषद,सीएडीई यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.

स्पर्धात्मकता कायदा 2002 च्या कलम 18 नुसार सीसीआयला, आपले कर्तव्य निभावण्यासाठी किंवा कायद्या अंतर्गत  सोपवलेले कार्य करण्यासाठी दुसऱ्या देशातल्या कोणत्याही एजन्सीशी करार अथवा व्यवस्था करण्याची परवानगी आहे.

त्याला अनुसरून सीसीआयने सहा सामंजस्य करार केले आहेत-

  1. संघीय व्यापार आयोग (एफटीसी ) आणि अमेरिकेचा न्याय विभाग (डीओजे)
  2. स्पर्धात्मकता महासंचालक, युरोपीय महासंघ
  3. संघीय मक्तेदारी विरोधी सेवा, रशिया
  4. ऑस्ट्रेलियन स्पर्धात्मकता आणि ग्राहक आयोग
  5. स्पर्धात्मकता ब्युरो कॅनडा

आणि

  1. ब्रिक्स स्पर्धात्मकता प्राधिकरण

सध्याचा प्रस्ताव सीसीआय  आणि सीएडीई यांच्यात झालेल्या अशाच प्रकारच्या सामंजस्य कराराशी संबंधित आहे.

 

* * *

Jaydevi PS/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1712950) Visitor Counter : 201