दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

स्पेक्ट्रम लिलाव 2021: यशस्वी निविदाकारांना दूरसंचार विभागाकडून स्पेक्ट्रम लहरी प्रदान


स्पेक्ट्रम लहरी प्रदान करण्यासह स्पेक्ट्रमचे एकत्रीकरण पूर्ण

नंतरच्या तारखेऐवजी ,स्पेक्ट्रम तात्काळ मिळवण्यासाठी निविदाकारांकडून 2306.97 कोटी रुपये आगाऊ रक्कम प्राप्त

Posted On: 16 APR 2021 9:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2021

 

दूरसंचार विभागाने आज (16.04.2021) रोजी स्पेक्ट्रम लिलाव, 2021 मधील यशस्वी निविदाकारांना स्पेक्ट्रम लहरींचे  वितरण यशस्वीरित्या पूर्ण केले. आज यशस्वी निविदाकारांना स्पेक्ट्रम लहरी प्रदान केल्याची पत्रे देण्यात आली.

स्पेक्ट्रम लहरी प्रदान करण्यासह  स्पेक्ट्रमचे एकत्रीकरण करण्याचे कार्यान्वयन पूर्ण झाले. ज्यायोगे, चालू स्पेक्ट्रम लिलावामध्ये दूरसंचार सेवा प्रदात्यांना (टीएसपी) नियुक्त केलेले स्पेक्ट्रम क्षेत्र यापूर्वी त्यांना दिलेल्या स्पेक्ट्रम क्षेत्राशी जेथे शक्य असेल तेथे, वेगवेगळ्या परवानाधारक सेवा क्षेत्रातील  (एलएसए) विविध बँडमध्ये सुसंगत तयार करण्यात आले आहेत.

800 मेगाहर्टझ बँडमधील 19 परवानाधारक सेवा क्षेत्र, 900 मेगाहर्टझ बँडमधील 8 परवानाधारक सेवा क्षेत्र, 1800 मेगाहर्टझ बँडमधील 21 परवानाधारक सेवा क्षेत्र, 2100 मेगाहर्टझ बँडमधील 3 परवानाधारक सेवा क्षेत्र , 2300  मेगाहर्टझ बँडमधील 16 परवानाधारक सेवा क्षेत्र यामध्ये स्पेक्ट्रमचे एकत्रीकरण पूर्ण झाले. एकत्रीकरणाची  कार्यवाहीदूरसंचार सेवा प्रदात्यांनी घेतलेल्या स्पेक्ट्रमचा अधिक कार्यक्षम उपयोग करण्यास सुलभ करते, जेणेकरून ग्राहकांच्या सेवेची गुणवत्ता सुधारली जाईल.

स्पेक्ट्रम लहरी प्रदान करण्याचा एक भाग म्हणून , समान बॅन्डमधील नंतरच्या तारखेला प्राप्त  होणाऱ्या स्पेक्ट्रम क्षेत्राऐवजी विक्री नं झालेले तात्काळ उपलब्ध असलेले स्पेक्ट्रम क्षेत्र  आणि परवानाधारक सेवा क्षेत्र प्रदान करण्याची मेसर्स भारती आणि मेसर्स  रिलायन्स जिओ या दोन दूरसंचार सेवा प्रदात्यांची विनंतीदेखील  सरकारने मान्य केली आहे. ऑगस्ट/सप्टेंबर 2021 ऐवजी, सरकारला 2306.97 कोटी रुपयांची   (मेसर्स भारतीकडून रु. 157.38 कोटी आणि मेसर्स रिलायन्स जिओ कडून रु. 2149.59 कोटी ) रक्कम तात्काळ प्राप्त झाली आहे.

हे लक्षात घ्यायला हवे की1 आणि  2 मार्च , 2021. रोजी आयोजित केलेल्या स्पेक्ट्रम लिलाव , 2021 मध्ये दूरसंचार सेवा प्रदात्यांनी  स्पेक्ट्रमच्या  800 मेगाहर्ट्झ, 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, आणि 2300 मेगाहर्ट्झ बँडचा एकूण 855.60 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम प्राप्त केला होता.  यशस्वी निविदाकारांकडून अधिग्रहित एकूण स्पेक्ट्रमची रु.77820.81 कोटी रक्कम देय आहे. त्यापैकी , निमंत्रित केलेल्या निविदांमधील अटी आणि शर्ती नुसार ,18 मार्च , 2021 रोजी दूरसंचार सेवा प्रदात्यांकडून रु. 21918.47 कोटी रक्कम अग्रीम देय स्वरूपात स्वीकारण्यात आली आहे.

 

 

 

Jaydevi PS /S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712355) Visitor Counter : 195