विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

नैऋत्य मोसमी पाऊस 2021 साठी संक्षिप्त अंदाज


Posted On: 16 APR 2021 7:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2021

दीर्घ  श्रेणी अंदाज

2021 च्या नैऋत्य मोसमी पाऊस हंगामासाठी 

 

2021 नैऋत्य मोसमी पर्जन्यवृष्टीचा संक्षिप्त अंदाज

a. नैऋत्य मोसमी पाऊस हंगाम (जून ते सप्टेंबर) या काळात संपूर्ण देशभरात पर्जन्यमान सामान्य  (दीर्घ कालावधीसाठी  सरासरी एलपीए  96  ते  104 % ) राहण्याची शक्यता आहे.

b. परिणामी, नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामात (जून ते सप्टेंबर) या काळात ± 5% मॉडेल त्रुटीसह दीर्घ कालावधी सरासरीच्या 98% इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे.  1961-2010 या कालावधीत संपूर्ण देशभरात हंगामी पर्जन्यमाची  दीर्घ कालावधी सरासरी 88 सेंमी  इतकी राहिली आहे.

c . समतोल अल निनो आणि दक्षिणी दोलायमान परिस्थिती ,प्रशांत महासागरावर आहे आणि . समतोल हिंद महासागर द्विध्रुव परिस्थिती ( आय ओ डी ) ने  हिंद महासागर व्यापलेला आहे. नवीन जागतिक मॉडेलचा अंदाज दर्शवितो की , अल निनो आणि दक्षिणी दोलायमानची सद्य  परिस्थिती  विषुववृत्तीय प्रशांत क्षेत्रावर कायम राहण्याची शक्यता आहे . आगामी पावसाळी  हंगामात हिंद महासागरामध्ये , अल निनो आणि दक्षिणी दोलायमानची नकारात्मक  परिस्थिती विकसित होण्याची शक्यता आहे.

प्रशांत  आणि हिंद महासागरावरील समुद्री  पृष्ठभागाचे तापमान (एसएसटी) भारतीय नैऋत्य मोसमी पावसावर  जोरदार प्रभाव पाडणारे म्हणून ओळखले जात असल्याने भारतीय हवामान विभाग या महासागरांच्या  खोल  सागरी पृष्ठभागावर विकसित होणाऱ्या  परिस्थितीची काळजीपूर्वक देखरेख करीत आहे.

भारतीय हवामान विभाग मे , 2021 च्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अद्ययावत अंदाज जारी करेल.एप्रिलचा अंदाज अद्ययावत करण्याबरोबरच, , चार एकसमान क्षेत्रांसाठी नैऋत्य मोसमी पाऊस हंगामाचा (जून - सप्टेंबर ) अंदाज आणि जून महिन्याचा अंदाज देखील जारी करेल.

1. पार्श्वभूमी

    2003  पासून , भारतीय  हवामान विभाग (आयएमडी) दोन टप्य्यात , संपूर्ण देशभराचा  नैऋत्य मोसमी पाऊस हंगाम ( जून - सप्टेंबर ) साठी  पाऊसमान सरासरी कार्यान्वित दीर्घ श्रेणी अंदाज (आर एल एफ ) जाहीर करतो. पहिल्या टप्प्याचा अंदाज एप्रिलमध्ये जारी केला जातो आणि दुसरा टप्प्याचा  किंवा अद्ययावत अंदाज मे च्या अखेरीला  जारी केला जातो.भारतीय हवामान विभागाने विकसित केलेल्या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक सांख्यिकीय एकत्रित अंदाज प्रणाली (एसईएफएस) चा वापर करून हे अंदाज तयार केले जातात . दुसर्‍या टप्प्यात,  एप्रिलच्या पूर्वानुमानाच्या अद्यतनाव्यतिरिक्त, संपूर्ण देशासाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी मासिक  अतिरिक्त अंदाज आणि भारताच्या चार एकसमान  प्रदेशांसाठी मोसमी पावसाचा (जून ते सप्टेंबर) चा हवामान अंदाज देखील जारी करण्यात येतो. 2017 पासून , भारतीय हवामान विभाग उच्च क्षमतेच्या  गतिमान जागतिक हवामान अंदाज प्रणाली ( सी एफ एस ) चा वापर करीत आहे , ही प्रणाली पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या मान्सून मोहिमेअंतर्गत विकसित करण्यात आली आहे .

 2.  नवीन हवामान अंदाज धोरण

क्षेत्रीय स्तरावर कार्यवाहीच्या योग्य नियोजनासाठी , मोसमी पावसाच्या  अवकाशीय वितरणासह क्षेत्रीय सरासरी पर्जन्यवृष्टी अंदाजासंदर्भात विविध वापरकर्त्यांकडून आणि सरकारी प्राधिकाऱ्यांकडून मागणी केली जाते . या विशिष्ट उद्देशासाठी,  मान्सून मोहीम सीएफएस ( एमएमसीएफएस ) सह भारतीय विभागाद्वारे वापरली  जाणारी  विविध जागतिक हवामान अंदाज आणि संशोधन केंद्रांच्या एकत्रित जागतिक हवामान मॉडेल्सवर आधारित  ,हवामान संशोधन आणि  सेवा कार्यालय, भारतीय हवामान विभाग , पुणे यांनी  मल्टी मॉडेल संच ( एम एम ई ) हवामान अंदाज प्रणाली विकसित केली आहे .

पहिल्या टप्प्याच्या अंदाजासाठी, विद्यमान सांख्यिकीय अंदाज प्रणाली आणि नवीन एमएमई आधारित अंदाज प्रणाली पूर्वानुमान तयार करण्यासाठी वापरली जाते. एमएमई आधारित पूर्वानुमान प्रणालीचा वापर,  मे मध्ये जाहीर होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी ,  संपूर्ण देश आणि चार एकसामान प्रदेशांसाठी  संभाव्य अंदाज तयार करण्यासाठी केला जातो.

 मासिक अंदाज तयार करण्यासाठी, भारतीय हवामान विभाग आता सांख्यिकी मॉडेलऐवजी गतिमान मल्टी मॉडेल संच आराखडा  वापरेल. सर्व चार महिन्यांचा  (जून ते सप्टेंबर) मासिक संभाव्य अंदाज  एमएमई अंदाज प्रणालीचा वापर करून आधीच्या  महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तयार केला जाईल.

देशातील बहुतांश  पर्जन्यमान क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्सून  गाभा क्षेत्रासाठी ( एम सी झेड ) स्वतंत्र अंदाज विकसित  करण्यासाठी  हवामान विभाग  प्रयत्नशील आहे. मान्सून  गाभा क्षेत्रासाठी हवामानाचा स्वतंत्र अंदाज कृषी नियोजन आणि पिकाचा उत्पादन अंदाज इत्यादींसाठी अधिक उपयुक्त ठरेल. मे महिन्यात पूर्वानुमान जारी करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात , भारतीय हवामान विभाग मान्सून  गाभा क्षेत्रासाठी ,  एमएमई प्रणाली आणि नवीन सांख्यिकीय मॉडेलवर आधारित एक स्वतंत्र संभाव्य हवामान अंदाज जारी करेल .

3 . संपूर्ण देशासाठी  2021 नैऋत्य मोसमी पाऊस हंगामासाठी (जून ते सप्टेंबर) पावसाचा अंदाज

3a, कार्यान्वयन सांख्यिकीय एकत्रित हवामान अंदाज प्रणाली (एसईएफएस) वर आधारित अंदाज

एसईएफएसवर आधारीत हवामान अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी पाऊस ± 5% मॉडेल त्रुटीसह दीर्घ कालावधी सरासरीच्या 98%इतका असण्याची शक्यता आहे. 1961-2010 या कालावधीत संपूर्ण देशभरात हंगामी पर्जन्यमानाची   दीर्घ कालावधी सरासरी 88 सेंमी इतकी राहिली आहे.

संपूर्ण देशासाठी ( जून - सप्टेंबर ) हंगामासाठी  नैऋत्य मोसमी पावसाचा  एसईएफएस वर आधारित 5  श्रेणीतील संभाव्य अंदाज  खाली दर्शविला आहे, हा अंदाज नैऋत्य मोसमी पावसाची अधिकाधिक संभाव्यता  ( दीर्घ कालावधी सरासरी 96-104% )सुचवितो.

Category

Rainfall Range

(% of LPA)

Forecast Probability (%)

Climatological

Probability (%)

Deficient

< 90

14

16

Below Normal

90 - 96

25

17

Normal

96 -104

40

33

Above Normal

104 -110

16

16

Excess

> 110

5

17

3. b.   मल्टिमॉडेल संच हवामान अंदाज प्रणालीवर आधारित अंदाज

2021 च्या नैऋत्य मोसमी पाऊस पावसासाचा  मल्टिमॉडेल संच हवामान अंदाज  (एमएमई)  अंदाज तयार करण्यासाठी मार्चच्या प्रारंभिक परिस्थितीचा वापर केला गेला आहे.एमएमसीएफएस सह भारतीय मान्सून प्रदेशातील अंदाजाचे सर्वाधिक अंदाज कौशल्य असणार्‍या हवामान मॉडेल्सचा उपयोग एमएमई अंदाज तयार करण्यासाठी केला जातो.

एमएमईच्या अंदाजानुसार,  2021च्या नैऋत्य मोसमी पाऊस हंगामात ( जून - सप्टेंबर) संपूर्ण देशात सरासरी सामान्य ( दीर्घ कालावधी सरासरी 96-104% )  पर्जन्यमान राहण्याचा अंदाज आहे.

मोसमी पावसाचा  ( जून - सप्टेंबर ) हंगामासाठी , अवकाशीय वितरणाचा संभाव्य अंदाज तीन श्रेणीमध्ये ( सामान्यपेक्षा जास्त , सामान्य आणि सामान्यपेक्षा कमी ) आकृती 1.मध्ये दर्शविला आहे. पावसाच्या अवकाशीय वितरणाचा अंदाज सूचित करतो की,देशाच्या बहुतांश भागात सामान्य किंवा सामान्यपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

4. विषुववृत्तीय प्रशांत  आणि हिंद  महासागरातील  समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान (एसएसटी) स्थिती

सद्यस्थतीत हिंद महासागरावर समतोल हिंद महासागर  द्विध्रुव परिस्थिती ( आयओडी ) आहे. एमएमसीएफएस आणि इतर जागतिक मॉडेल्सच्या ताज्या अंदाजानुसार असे दिसून आले आहे की, आगामी पावसाळ्यात समतोल  हिंद महासागर  दोलायमान परिस्थिती  नकारात्मक हिंद महासागर  द्विध्रुव परिस्थितीत बदलू शकते.

आकृती 1, नैऋत्य मोसमी पाऊस हंगाम 2021 ( जून - सप्टेंबर ) या कालावधीत मोसमी पावसाचा  तीन श्रेणीनुसार (सामान्यपेक्षा कमी , सामान्य आणि सामान्यपेक्षा जास्त ) संभाव्य अंदाज.  ही आकृती सर्वाधिक शक्यता  श्रेणी  तसेच त्यांच्या संभाव्यतेचे वर्णन करते. पांढऱ्या छटा असलेले क्षेत्र हवामानविषयक संभाव्यतेचे  प्रतिनिधित्व करते.उत्कृष्ट दोन हवामान मॉडेल्सच्या गटाने तयार केलेला एमएमई हवामान अंदाज वापरून संभाव्य अंदाज तयार केला आहे. ( तीन श्रेणींमध्ये प्रत्येकी 33.33%  इतका समान हवामानविषयक अंदाज वर्तवला आहे. )

 

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712325) Visitor Counter : 1282


Read this release in: Hindi , Tamil , English , Urdu