इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या तीन नव्या उपक्रम/ सेवांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव अजय प्रकाश साहनी यांनी केले उद्घाटन

Posted On: 15 APR 2021 7:52PM by PIB Mumbai

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव आणि नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडिया (निक्सी)चे अध्यक्ष अजय प्रकाश साहनी यांनी आज निक्सिच्या तीन अभिनव उपक्रमांचे उद्घाटन केले. आयपीव्ही 6 साठी जागृती आणि देशात स्वीकार यासाठी टेलीकम्युनीकेशन विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यासह निक्सी सहाय्यक भूमिका निभावणार आहे.

 

या तीन नव्या उपक्रमांची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे- 

1. आयपीव्ही 6 तज्ज्ञ  पॅनेल (आयपी गुरु ) (https://nixi.in ): आयपीव्ही 6 चा स्वीकार ज्या भारतीय आस्थापनांना तांत्रिक दृष्ट्या आव्हान वाटत आहे अशांना सहाय्य करण्यासाठी आयपी गुरु हा गट आहे. आयपीव्ही 6 अनुसरण्यासाठी आवश्यक तंत्र सहाय्य करण्यासाठी एजन्सीची सेवा भाड्याने घेण्यासाठीही हा तज्ज्ञ गट मदत करणार आहे. 

2.निक्सी अकादमी (https://training.nixi.in ): आयपीव्ही 6 सारखे आणि सर्वसाधारणपणे शैक्षणिक संस्थामधून शिकवले जात नाही असे तंत्रज्ञान भारतात शिकण्यासाठी  तांत्रिक आणि बिगर तांत्रिक लोकांना शिक्षण देण्यासाठी निकसी अकादमी उभारण्यात आली आहे. वापरण्यासाठी सुलभ असलेला हा मंच, नेटवर्क ऑपरेटर आणि शिक्षकांना उत्तम प्रथा, तत्वे आणि तंत्र, इंटरनेट संसाधनांचे उत्तम व्यवस्थापन आणि योग्य इंटरनेट तंत्राचा अधिक प्रभावी वापर यासाठी मदत करतो.

3. निक्सी आयपी- निर्देशांक  (https://ipv6.nixi.in ): निक्सीने इंटरनेट समुदायासाठी आयपीव्ही 6 निर्देशांक पोर्टल विकसित केले आहे. निक्सी आयपी- निर्देशांक  पोर्टलभारतात आणि जगभरात आयपीव्ही 6 चा स्वीकार करण्याचा दर दर्शवेल.

निक्सी ही ना नफा तत्वावरची संस्था ( कंपनी कायदा 2013 चे कलम 8) 2003 पासून भारतीय नागरिकांसाठी इंटरनेट पायाभूत सुविधांचा प्रसार करण्यासाठी काम करत आहे.

***

S.Thakur/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1712108) Visitor Counter : 54


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi