PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
15 APR 2021 6:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 15 एप्रिल 2021



#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
यूएस एफडीए, ईएमए, यूके एमएचआरए, पीएमडीए जपान यांनी किंवा डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन वापराच्या यादी (ईयूएल) मध्ये सूचीबद्ध असलेल्या आणि नियंत्रित वापरासाठी मंजूर केलेल्या कोविड-19 लसींसाठी भारतात उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारने आज नियामक प्रक्रिया मार्ग प्रक्रिया जारी केली आहे.
देशभरात कोविड -19 च्या लसींचा एकूण 11.44 कोटी मात्रांचा टप्पा पार झाला आहे. सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील लसीकरणाला चालना देण्यासाठी, दिनांक 11 ते 14 एप्रिल 2021 या चार दिवसांच्या कालावधीत, देशभरात लसीकरण उत्सव(टीका उत्सव) साजरा करण्यात आला. या लसीकरण उत्सवाच्या कालावधीत, एकूण लसीकरणाच्या आकडेवारीनुसार 1,28,98,314 पात्र लोकसंख्येच्या समूहांना लसींच्या मात्रा देऊन लसीकरणाने मोठी झेप घेतली आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 16,98,138 सत्रांद्वारे 11,44,93,238 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी 90,64,527 आरोग्य कर्मचाऱ्यांना(HCW) पहिली मात्रा, 56,04,197 आरोग्य कर्मचाऱ्यांना (HCW) दुसरी मात्रा, 1,02,13,563, आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (FLW) पहिली मात्रा, 50,64,862 कर्मचाऱ्यांना (FLW) दुसरी मात्रा, वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या 4,34,71,031 लाभार्थ्यांना पहिली मात्रा,तर 27,47,0192 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा, तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटातील 3,74,30,078 लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 8,97,961 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा,देण्यात आली.
कोविड- 19 चा धोका जास्त असलेल्या वयोगटातल्या लोकांचे या विषाणू विरोधात लसीकरण करण्याच्या प्रयत्नात भारत मोठी प्रगती करत आहे. 11 ते 14 एप्रिल या काळात लसीकरण उत्सव करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली हाक लक्षात घेऊन, खाजगी आणि सार्वजनिक कामाच्या ठिकाणी अनेक कार्यस्थळ लसीकरण केंद्रे (सीव्हीसी) कार्यान्वित झाल्याचे दिसून आले. कोणत्याही दिवशी सरासरी 45,000 सीव्हीसी कार्यान्वित असल्याचे दिसून आले. लसीकरण उत्सवाच्या पहिल्या दिवशी 63,800, दुसऱ्या दिवशी 71,000, तिसऱ्या दिवशी 67,893 तर चौथ्या दिवशी 69,974 सीव्हीसी कार्यरत होती. सर्वसाधारणपणे, रविवारी लसीकरण झालेल्यांची संख्या कमी (सुमारे 16 लाख) असते मात्र लसीकरण उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत 27 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
चार दिवसांच्या या लसीकरण उत्सवात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. 11 एप्रिलला 29,33,418 मात्रा तर दुसऱ्या दिवशी 40,04,521 मात्रा देण्यात आल्या. 13 एप्रिलला 26,46,528 आणि 14 एप्रिल रोजी 33,13,848 मात्रा देण्यात आल्या.
लसीकरण उत्सवात पात्र वयोगटातल्या लोकांना लसीच्या 1,28,98,314 मात्रा देण्यात आल्या.
तीन राज्यानी आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र (1,11,19,018), राजस्थान (1,02,15,471) आणि उत्तर प्रदेश (1,00,17,650) यांचा यात समावेश आहे.
भारतातील दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत सतत भर पडत आहे.गेल्या 24 तासांत 2,00,739 नव्या रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्यप्रदेश, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांतील दररोजच्या बाधित रुग्णसंख्येत अधिक वाढ होताना दिसत आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी 80.76% रूग्ण या 10 राज्यांत आहेत.
महाराष्ट्राच्या दैनंदिन बाधित रुग्णांत, सर्वाधिक 58,952 नव्या रुग्णांची नोंद झाली.
बाधित राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनसह अत्यावश्यक वैद्यकीय साधनांचा सुरळीत पुरवठा राहावा यासाठी ईजी 2 गेल्या वर्षभरापासून सातत्याने लक्ष ठेवून असून वेळोवेळी उद्भवणाऱ्या आव्हानांची दखल घेऊन त्यांचे निराकरण करत आहे. कोविड रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, राज्यांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ईजी 2 सातत्त्याने राज्ये, ऑक्सिजन उत्पादक आणि इतर संबंधीताशी बैठका आणि संवाद साधत आहे.देशात पुरेशी म्हणजे सुमारे 7127 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता आहे आणि पोलाद कारखान्यात उपलब्ध अतिरिक्त ऑक्सिजनचाही वापर करण्यात येत आहे. देशात दररोज सुमारे 7127 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता आहे.
डॉ हर्ष वर्धन यांनी या कार्यक्रमात आनंद व्यक्त करताना, तीन वर्षांपूर्वी (2018 मध्ये) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील जंगला येथे पहिल्या आयुष्मान भारत- आरोग्य केंद्राचे उद्घाटन केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्याच्याकडून प्रेरणा घेताना ते म्हणाले, "ही केंद्रे बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाशी अनुरूप आहेत जी सर्वांना आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी समाजात मानवी प्रतिष्ठा, समता व सामाजिक न्याय स्थापन करण्याच्या आमच्या प्रयत्नांना प्रेरणा देते.”
इतर माहिती
रेमडीसीवीरच्या सात उत्पादकांची सध्याची स्थापित क्षमता दरमहा 38.80 लाख कुपी इतकी आहे. सहा उत्पादकांना दरमहा 10 लाख कुपी उत्पादन क्षमता असणार्या सात अतिरिक्त कार्यनिर्माण स्थासाठी जलदगतीने मंजुरी देण्यात आली आहे. दर महिन्याला आणखी 30 लाख कुप्याचे उत्पादन लवकरच सुरु होईल. यामुळे महिन्याला सुमारे 78 लाख कुप्यांपर्यंत उत्पादन क्षमता वाढीस लागेल.
महाराष्ट्र अपडेट्स
राज्यात बुधवारी 58,952 नवीन रुग्णांची नोंद झाली, यामुळे एकूण सक्रीय रुग्णसंख्या 6.12 लाख एवढी झाली. राज्यात 1.11 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत, राज्य लसीकरणात देशात अग्रेसर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोविड-19 महामारी नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याची विनंती केली आहे, त्यामुळे प्रभावित झालेल्यांना राज्य आपत्ती निवारण निधीतून (SDRF) मदत करता येईल. दरम्यान, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल-1 येथील देशांतर्गत विमानसेवा 21 एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवांसोबतच टर्मिनल- 2 वरुन संचलित केल्या जाणार आहेत. कोविड संक्रमणात वाढ होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
FACT CHECK




***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712096)
Visitor Counter : 217