संरक्षण मंत्रालय
मंगळूरूच्या समुद्रात बेपत्ता मच्छिमारांचा शोध आणि बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाचा ताफा तैनात
Posted On:
14 APR 2021 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2021
मंगळूरूच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मच्छिमारांचा शोध आणि बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाकडून जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली आहेत. 13 एप्रिल 2021 रोजी दुपारी दोन वाजता 14 मच्छीमार असणाऱ्या 'आयएफबी रबा' या भारतीय मच्छिमार बोटीला न्यू मंगळूरूच्या पश्चिमेला 40 सागरी मैलांवर सिंगापूरच्या 'एमव्ही एपीएल ले हॅवेर' या व्यापारी जहाजाची धडक बसल्याची माहिती मिळाली होती. तटरक्षक दलाच्या जहाजांच्या शोध आणि बचावकार्याला पाठबळ देण्यासाठी भारतीय नौदलाची तिल्लचांग आणि कल्पेनी जहाजे तसेच गोव्याहून नौदलाचे विमान तैनात केले आहे.
बचावलेल्या दोन मच्छिमारांना सुरक्षित किनार्यावर हलविण्यात आले असून आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित नऊ मच्छीमारांचा शोध सुरू आहे.
बचाव कार्यात मदत करण्यासाठी आयएनएस सुभद्रा या गस्ती नौकेला कारवारहून पाठविले असून यामध्ये एका डायव्हिंग (पाणबुडे) पथकाचा देखील समावेश आहे. हे जहाज 14 एप्रिल रोजी घटनास्थळी पोहोचले असून बुडालेल्या मासेमारी जहाजाचा शोध घेण्यासाठी 2 विशेष डायव्हिंग पथके शोध कार्य करीत आहेत.
* * *
S.Patil/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711884)
Visitor Counter : 239