ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानके आता निःशुल्क उपलब्ध
सूक्ष्म उद्योग आणि स्टार्टर्स तसेच महिला उद्योजकांसाठी मानके चिन्ह मिळवण्यासाठीच्या किमान शुल्कात पन्नास टक्के कपात, परवाना नूतनीकरणासाठी अतिरिक्त 10 टक्के सूट
Posted On:
13 APR 2021 6:03PM by PIB Mumbai
ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव लीना नंदन आणि भारतीय मानक ब्युरोचे संचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी भारतीय मानक ब्युरोमधील प्रमाणीकरणाविषयक नवीन नियमांविषयी माहिती देण्यासाठी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे पत्रकार परिषदेला संबोधित केले.
भारतीय मानक ब्युरोच्या सुधारित नियमांविषयी सांगताना नंदन म्हणाल्या की विकासाच्या वाटेवर भारतीय मानक ब्युरोने अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आणि देशाच्या विकासाला हातभार लावला आहे. भारतीय मानक ब्युरोने आता अनेक नवीन गोष्टींचा पाया घातला आहे. आपल्या उत्पादन क्षेत्राची कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रमाणीकरणासाठी आणि उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी त्यांचा उपयोग होतो. नवीन मानक प्रमाणीकरण विकसित करताना व जारी करताना आम्ही अनेक खात्यांसह सविस्तर काम केले. भारतीय मानक ब्युरोच्या सुधारणांवर एक पुस्तिका यावेळी प्रकाशित करण्यात आली.
भारतीय मानक ब्युरो चे संचालक पी. के. तिवारी म्हणाले की, भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणीकरण आता प्रत्येकाला निःशुल्क उपलब्ध असेल. प्रमाणीकरणाच्या क्षेत्रात अभियांत्रिकी, स्वयंचलन व मनुष्यबळात वाढ यांच्या एकत्रीकरणाने हे साध्य करायचे आहे. प्रत्येक मानकासाठी किंवा मानकाच्या सुधारित आवृत्तीसाठी विभागीय समितीच्या त्रैमासिक बैठका, विकासाच्या टप्प्यावर असलेल्या किंवा नव्याने ठरत असलेल्या मानकांसाठी विविध टप्प्यावर काळाचे बंधन यासारखे नियम प्रथमच लागू करण्यात आले आहेत. कृती-संशोधनाला प्रमाणीकरण प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनवणे, प्रत्येक खात्यात मानक प्रमाणीकरण सेल मार्फत प्रमाणीकरणाचे ब्रॉड बॅन्डिग, एका वैज्ञानिक (सायंटिफिक) अधिकाऱ्याला वर्षभरात 30 पेक्षा जास्त मानकांची प्रक्रिया करावी लागू नये म्हणून मनुष्य बळाचा पुरवठा, मानके- प्रमाणीकरण व ISO/IEC प्रमाणीकरण यामध्ये सुसूत्रता साधण्यासाठी मानकांची पुनर्रचना तसेच ते नव्याने ठरवणे आणि ISO/IEC प्रमाणीकरण या दोन्ही प्रक्रिया समांतर सुरू ठेवणे, अशा अनेक बाबींचा अंतर्भाव प्रथमच करण्यात आला आहे. भारतीय मानक ब्युरोने 21000 मानके प्रमाणित केली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. प्रत्येक उत्पादनासाठी उत्तम प्रमाणीकरण लागू करून संबंधित उत्पादनाची बाजारपेठ पर्यायाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत विकास घडवून आणणे. उद्योग क्षेत्र विशेषतः सूक्ष्म क्षेत्राच्या लाभासाठी सूक्ष्म उद्योग क्षेत्राला प्रमाणीकरण निशुल्क उपलब्ध होईल व e-BIS च्या प्रमाणीकरणासाठीच्या संकेतस्थळावरून ते डाऊनलोड करून घेता येईल. मानके प्रमाणीकरणाच्या विविध क्षेत्रात सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये एकवाक्यता येण्यासाठी 'एक राष्ट्र एक मानक' या कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. RSDO, इंडियन रोड काँग्रेस, आणि संरक्षण खात्याचे मानके संचालनालय यासारख्या विविध मानके विकास संस्थांसह (SDO) विचार विनिमय सुरू आहे.
***
S.Thakur/V.Sahajrao/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711666)
Visitor Counter : 222