रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

एनएचएआय रस्त्यांच्या स्थितीच्या सर्वेक्षणासाठी नेटवर्क सर्वेक्षण वाहनांचा (NSV) वापर अनिवार्य करणार

Posted On: 13 APR 2021 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021

प्रवाशांना अधिक चांगले रस्ते प्रदान करण्याच्या कटीबद्धतेच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने (NHAI) राष्ट्रीय महामार्गांची गुणवत्ता उंचावण्यासाठी नेटवर्क सर्वेक्षण वाहन (NSV) चा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. एनएसव्हीच्या मदतीने रस्त्यांच्या स्थितीचे सर्वेक्षण प्रकल्प पूर्ण झाल्याच्या प्रमाणीकरणावेळी आणि त्यानंतर दर सहा महिन्यांनी करणे अनिवार्य असणार आहे. सल्लागार सेवांच्या प्रमाणित निविदा प्रक्रियेत ही तरतूद करण्यात आली आहे.

या उपयोजनामुळे महामार्गांची एकूण गुणवत्ता वाढविण्यात मदत होईल. सध्या एनएसव्ही 3600 छायाचित्रांसाठी उच्च-रिजोल्यूशनचा डिजिटल कॅमेरा, तसेच नियमितपणे छायाचित्र व्हिडीओचित्रण करत असते, लेझर रोड प्रोफाईलमीटर आणि इतर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रस्त्यांच्या अवस्थेचे मोजमाप करते.

एनएसव्हीच्या सहाय्याने रस्त्याच्या पृष्ठभागाचे मोजमाप, पृष्ठभाग क्रॅकिंग, खड्डे आणि पॅचेस यासह रस्त्याच्या स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी माहिती एकत्रित करण्यास मदत करेल. त्याशिवाय एनएसव्ही महामार्गालंगतचे नाले आणि रस्त्यांचे फर्निचर याच्याशी संबंधित माहितीसुद्धा प्रदान करेल.

S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711591) Visitor Counter : 158


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi