वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पियूष गोयल यांनी केला आयात निर्यातदारांना त्वरित संपर्कासाठी ‘DGFT ट्रेड फॅसिलिटेशन’ - व्यापार सुलभ अॅपचा शुभारंभ
ट्रेड फॅसिलिटेशन अॅप उद्योगक्षेत्र 4.00 साठी
हे अॅप भारताचा आत्मनिर्भरतेचे प्रतिक - कारभारात सुलभता, किफायतशीरपणा व उपलब्धता वाढवण्यासाठी
विविध स्थानिक भाषांमध्ये अॅप्स विकसित करण्याचे केले आवाहन
Posted On:
12 APR 2021 5:31PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उदयोगमंत्री पियुष गोयल यांनी आज ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परदेश व्यापार महासंचालनालय व्यापार सुलभ ‘DGFT ट्रेड फॅसिलिटेशन’ मोबाईल अॅपचा शुभारंभ केला. व्यापारसुलभता तसेच आयातनिर्यातदारांना त्वरित माहिती मिळावी या उद्देशाने हे अॅप तयार केले आहे.
अनेकदा व्यापारासंबधीच्या प्रक्रिया विनाकारण किचकट होतात आणि जेव्हा त्या मोबाईल अॅपसारख्या माध्यमातून एका बटणाच्या स्पर्शावर अवलंबून असतात तेव्हा व्यापारसुलभतेची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवान विकासाची हमी आपल्याला देता येते. , असे यावेळी पियुष गोयल यांनी सांगितले. “आपल्याला यासाठी विनाकागद, स्वयंचलित प्रक्रिया व्यवस्थेकडे, व्यापाऱ्यांसाठी सुलभ प्रक्रिया, विविध विभाग आणि डिजिटल पेमेंटमध्ये ऑनलाईन माहिती विनिमय (डेटा एक्चेंज) याकडे वळणे आवश्यक असते”
कोविडपश्चात जगात तंत्रज्ञान समर्थ कारभार हा भारताचा विकास आणि स्पर्धात्मक योग्यता ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावेल. एक खिडकी (सिंगल विन्डो) पद्धती ही भारतातील सेवा प्रदानात आमुलाग्र बदल घडवून आणणारी ठरली. या पद्धतीने स्थानामुळे येणाऱ्या मर्यादा व मैलाच्या शेवटच्या टप्प्यात होणारा लाभ यातून सुटका केली तसेच व्यापारसुलभतेचा फायदा दिला. तंत्रज्ञानातील प्रगती ही अर्थव्यवस्थेचा विकास करेल आणि स्पर्धात्मक जागतिक बाजारात भारतीय कंपन्यांना बळकट करेल असे त्यांनी नमूद केले.
विदेश व्यापार महासंचालनालय (DGFT) ची प्रशंसा करताना गोयल म्हणाले की नवीन व्यापार सुलभ मोबाईल अॅप म्हणजे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. एका बटनावर व्यापारसंबधी विविध प्रक्रिया आणि शंकांना उत्तरे देणारे ते ओम्नी चॅनेल अॅप आहे. किमान शासन आणि कमाल प्रशासन या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीशी साधर्म्य साधत, विदेश व्यापार महासंचालनालय कागदपत्रांच्या प्रमाणिकरण व ई-प्रमाणपत्र यांच्या मदतीने व्यापाऱ्यांच्या सहाय्याला उभे आहे. यामुळे आयात निर्यातीसंबधीच्या वेळेत बचत होईल तसेच पारदर्शकतेची हमी मिळेल, व्यापार सुलभ मोबाईल अॅप हे भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतिक आहे. यामुळे प्रशासन सुलभ, किफायतशीर होऊन त्यापर्यंत पोचणे सोपे होईल व परंपरागत दृष्टीकोनातही फरक पडेल.
व्यापार सुलभ मोबाईल अॅप हे उद्योग 4.00 साठी तयार आहे . त्याच्याकरवी पुढील कामे होतील.
वेळोवेळी (रिअल टाईम) व्यापार धोरण अद्ययावतता, माहिती . अर्जाची स्थितीदर्शक अलर्ट , सहाय्याच्या विनंतीचा पाठपुरावा
· मालाप्रमाणे आयातनिर्यात धोरण व आकडेवारी IEC पोर्टफोलियोचा माग
· व्यापारासंबधी शंकांना कृत्रिम प्रज्ञेवर आधारित 24*7
· विदेश व्यापार महासंचालनालय (DGFT) सेवा सर्वांना उपलब्ध
· आपला ट्रेड डॅशबोर्ट केव्हाही व कुठेही उपलब्ध
मोबाईल इंडियाने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी तसेच परदेशी व्यापाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय संधी खुल्या केल्या आहेत.यामुळे गुणवत्तेबाबत जागरुकता व स्पर्धादराच्या अंतर्गत उद्योग निर्मितीला चालना मिळेल. यामुळे निर्यातीचे 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलरचे उद्दिष्ट व 5 ट्रिलियन डॉलर GDP चे लक्ष्य 2025 पर्यंत साध्य होईल. अधिक सुधारित अॅप तयार करण्यासाठी सर्व संबधितांकडून अधिक सूचना व कल्पना यांचे स्वागतच आहे असे सांगत गोयल यांनी यात अधिक सुधारणा या तंत्रज्ञान रुपांतरणासाठी चालनाच देतील असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान आणि भाषातज्ञ यांनी विविध सरकारी अॅप ही स्थानिक भाषेत आणावी त्यामुळे नागरिकांमधील एकात्मतेला आधार मिळेल असे सुचवले.
DGFT चे नवीन मोबाईल अॅप हे आयातनिर्यातदारांसाठी खालील सुविधा पुरवते.
· वेळोवेळी (रिअल टाईम) व्यावार धोरण अदययावतता, व कार्यक्रम सूचना
· कोठेही केव्हाही उपलब्ध डॅशबोर्ड
· DGFTच्या सर्व सेवांकडे अॅपद्वारे प्रवेश
व्यापारमालाप्रमाणे आयातनिर्यात धोरण व आकडेवारी उपलब्ध
· व्यापारसंबधी शंकांसाठी 24x7 व्हर्च्युअल सहाय्य
· आपला IEV पोर्टफोलिओ ट्रॅकिंग – IEC अर्ज व प्रमाणीकरण
· अर्जाच्या स्थितीबद्द्ल वेळोवेळी अलर्ट
· वेळोवेळी सहाय्यासाठीच्या विनंतीला प्रतिसाद व ट्रॅकिंग उपलब्ध
· व्यापारसंबधी सूचना व सार्वजनिक नोटिस सहजपणे सामायिक करता येतील
हे अॅप अड्रॉईड व iOs प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. https://dgft.gov.in या DGFT च्या संकेतस्थळावरून ते डाऊनलोड करून घेता येईल. टाटा कन्सल्टन्सि सर्विसेस (TCS) ने ते परदेश व्यापार महासंचालनालयच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे तयार केले आहे.
***
JPS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711406)
Visitor Counter : 237