कंपनी व्यवहार मंत्रालय

भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाने, भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ(प्री-पॅकेज्ड नादारी तोडगा प्रक्रिया) नियमन 2021 ची अधिसूचना जारी केली

प्रविष्टि तिथि: 09 APR 2021 10:03PM by PIB Mumbai

 

नादारी आणि दिवाळखोरी संहिता(सुधारणा) अध्यादेश, 2021, 4 एप्रिल 2021 रोजी जारी करण्यात आला असून त्याअन्वये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या श्रेणीमध्ये असलेल्या कॉर्पोर्रट कंपन्यांना प्री-पॅकेज्ड नादारी तोडगा प्रक्रियेचा लाभ मिळणार आहे. हा अध्यादेश मंजूर झाल्यानंतर, भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाने, आज भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ(प्री-पॅकेज्ड नादारी तोडगा प्रक्रिया) नियमन 2021 (PPIRP)ची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेमुळे, या सुधारित नियमाची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.

PPIRP नियमनानुसार, भागधारकांनाजे फॉर्म वापरायचे आहेत, तसेच या सुविधेच्या प्रत्यक्ष वापरासाठी करावयाची कामे या सगळ्याची माहिती या  अधिसूचनेत देण्यात आली आहे. ही माहिती खालीलप्रमाणे :

a.      तोडगा अंमलबजावणी करणारे व्यावसायिक म्हणून पात्रता आणि नियुक्तीच्या अटी;

b.     नोंदणीकृत मुल्यांकनदार आणि इतर व्यावसायिकांची पात्रता;

c.      अधिकृत प्रतिनिधींची ओळख आणि निवड;

d.     सार्वजनिक घोषणा आणि भागधारकांचे दावे;

e.      माहिती पत्रक;

f.       कर्जदाता आणि कर्जदात्यांच्या समितीच्या बैठका;

g.     तोडगा योजनेसाठी आमंत्रण;

h.     मूळ तोडगा योजना आणि सर्वोत्तम तोडगा योजना यातील स्पर्धा;

a.      तोडगा योजनेचे मूल्यांकन आणि तो विचारार्थ घेणे;

j.  तोडगा देणाऱ्या व्यावसायिकांसह कॉर्पोरेट कर्जदारासाठीची जबाबदारी घेणारे व्यवस्थापन आणि;

k.     PPIRP  अर्थात (प्री -पॅकेज्ड नादारी तोडगा प्रक्रिया) नियमन 2021 रद्द करणे.

PPIRP नियमन आजपासून लागू झाले आहेत. हे नियमन www.mca.gov.in  आणि www.ibbi.gov.in.  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1710769) आगंतुक पटल : 288
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi