वस्त्रोद्योग मंत्रालय
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी श्रीनगर इथल्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या पहिल्या पदवीदान समारंभाचे अध्यक्षपद भूषविले
वस्त्र-तंत्रज्ञान हा अभ्यासक्रमाचा भाग व्हावा म्हणून निफ्ट काम करणार : स्मृती इराणी यांचे प्रतिपादन
Posted On:
09 APR 2021 8:52PM by PIB Mumbai
श्रीनगरच्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था म्हणजेच निफ्टचा पहिला पदवीदान समारंभ आज श्रीनगरच्या शेर-ए-कश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी तर केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे जम्मूतील राजभवन येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
श्रीनगरच्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या पहिल्या तुकडीने या संस्थेच्या 35 वर्षांच्या इतिहासांच्या पानांमध्ये सोनेरी भर टाकली आहे , असे प्रतिपादन यावेळी स्मृती इराणी यांनी केले. जीवन जे पुढे करेल त्याला सामोरे जाण्यासाठी सदैव तयार राहण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले, तसेच राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेत मिळालेल्या शिक्षणामुळे मार्गात येणाऱ्या कोणत्याही परिक्षा व कठीण परिस्थितींना सामोरे जाण्यास विद्यार्थी सज्ज असल्याचा विश्वास व्य्क्त केला. जम्मू कश्मीर सरकारने नुकताच जम्मू कश्मीर औद्योगिकीकरणा धोरणाचा भाग म्हणून 30,000 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे, त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न करावेत, असेही इराणी यांनी सांगितले. तंत्रज्ञानाधारित वस्त्रोद्योग, म्हणजे पोशाख आणि सजावट याशिवायच्या उद्योगांसाठी वस्त्र अभिकल्प आणि उत्पादन हे क्षेत्र भविष्यात खूप विस्तारणार आहे, आणि वस्त्रोद्योग मंत्रालय त्याचे संपूर्ण लक्ष त्याकडे देण्याचा कसोशीने प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. नजिकच्या भविष्यात तंत्रज्ञानाधारित वस्त्रोद्योग हा अभ्यासक्रमाचा भाग व्हावा म्हणून निफ्ट काम करेल असेही त्यांनी सांगितले.
पदवीधारक, त्यांचे पालक यांचे अभिनंदन करत युवक कल्याण आणि क्रिडामंत्री किरेन रिजीजू यांनी सजावट आणि फॅशन उद्योगात वाढीच्या प्रचंड क्षमता आहेत त्यामुळे उपलब्ध झालेल्या संधींचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा असे आवाहन केले. देशाची सॉफ्ट पॉवर आणि प्रतिमा यांची उभारणी करण्याच्या कामी विद्यार्थ्यांनी महत्वाची भूमिका निभावली पाहिजे असे म्हणत त्यांनी निफ्ट, श्रीनगरचे माजी विद्यार्थी या बाबतीत आघाडीवर असतील अशी खात्री व्यक्त केली.
निफ्ट, श्रीनगर येथे फॅशन अभिकल्प व फॅशन कम्युनिकेशन असे प्रत्येकी चार वर्षांच्या कालावधीचे दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
***
Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710746)
Visitor Counter : 203