रेल्वे मंत्रालय

झारखंडमधील हंसदिहा- गोड्डा या रेल्वे मार्गाचे पियुष गोयल यांच्याकडून लोकार्पण


गोड्डा -नवी दिल्ली हमसफर विशेष ट्रेनला पियुष गोयल यांनी दाखवला हिरवा झेंडा

Posted On: 08 APR 2021 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 एप्रिल 2021

 

झारखंडच्या सर्वांगिण विकासाची हमी देत केंद्रीय रेल्वेमंत्री, वाणिज्य आणि व्यापार, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्री  पियुष गोयल यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  हंसदिहा- गोड्डा या नवीन रेल्वे मार्गाचे राष्ट्रार्पण केले तसेच नवी दिल्ली हमसफर विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. हा नवीन रेल्वे मार्ग अधिक चांगला व कमी खर्चिक वाहतूक पर्याय देईल तसेच मालाची विनाविलंब वाहतूक करण्यासाठी उपयोगी ठरेल.  त्याचप्रमाणे झारखंडमधील दुमका आणि गोड्डा या भागांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला चालना देईल. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत  शर्मा तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  उपस्थित होते.

झारखंड राज्य, खनिजे व अनेक धार्मिक स्थळे यासाठी प्रसिद्ध आहे. हे महात्म्य प्रत्यक्षात आणण्याच्या कामी भारतीय रेल्वेचा सहभाग राहील असे पियुष गोयल यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.  हंसदिहा- गोड्डा हा प्रकल्प 2011 मध्ये मंजूर झाला होता परंतु 2014 पर्यंत या प्रकल्पात कोणतीही प्रगती झाली नव्हती 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्पांचा आढावा घेतला तेव्हा या प्रकल्पासाठी जमीन संपादित केली नसल्याचे उघड झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आदेशावरून नव्या मार्गाच्या प्रकल्पाच्या बाबतीत त्वरित प्रगती करण्यात आली. आत्तापर्यंत या प्रकल्पात 550 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. नवीन हंसदिहा-गोड्डा रेल्वे मार्गामुळे या भागात नवीन रोजगार संधी उपलब्ध होतील. भविष्यात या प्रदेशातील शेतकऱ्यांची उत्पादने बाजारात आणण्यासाठी किसान रेल्वे सुरु करता येईल.

झारखंड राज्याच्या विकासासाठी 663 कोटी रुपये पायाभूत कामांचा विकास व झारखंड राज्यातील प्रवाशांच्या सुविधांसाठी खर्च झाले आहेत.

हंसदिहा-गोड्डा नवीन रेल्वे मार्ग ही झारखंडच्या लोकांची  फार पूर्वीपासूनची मागणी आहे. नवीन रेल्वे मार्ग उभारताना दोन मोठे पूल आणि 33 छोटे पूल उभारण्यात आले.

याशिवाय, या नवीन मार्गावरील रेल्वे सेवेमुळे भारताच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत जाणाऱ्या प्रवाशांना लाभ मिळेल

 

* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1710536) Visitor Counter : 180


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi