आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक आरोग्य दिनी जागतिक आरोग्य संघटनेला केले संबोधित

Posted On: 07 APR 2021 11:38AM by PIB Mumbai

आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या  दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालयाला दूरदृश्य प्रणालीद्वारे  संबोधित केले.

 

त्यांचे भाषण  खालीलप्रमाणे:  

हा जागतिक आरोग्य दिन जागतिक समुदायाने एकत्रित येऊन  महामारीचा लढा देण्याला एक वर्ष पूर्ण  झाल्याची साक्ष देत आहे. यावर्षी निवडलेली संकल्पना , 'प्रत्येकासाठी एक न्याय्य आणि आरोग्यदायी जग निर्माण करणे' यापेक्षा अधिक सुयोग्य ठरू शकत  नाही,कारण  आपली धोरणे, कार्यक्रम आणि कृती सर्वांच्या निरोगी भविष्याच्या दिशेने असतील याची जबाबदारी आपली आहे.  

 

 हे ही यामुळे  वाढत्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे, की लोकांचे आरोग्य मूलभूतपणे समाजातील सामाजिक सेवांच्या योग्य परिस्थितीवर अवलंबून आहे. समान आरोग्य सेवा  आणि सामाजिक न्याय एकमेकांशी जोडलेले असतात.

 

ह्या मागील वर्षात प्रत्येक नागरिकाला त्याची  सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा सर्व आरोग्य सेवा सार्वत्रिकपणे  सुनिश्चित कराव्यात याची जाणीव आपल्याला झाली 

 

आज आयोजित केलेला हा कार्यक्रम  मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या  संयुक्त सहयोगाने ‘सर्वांसाठी आरोग्य’ सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने एक लवचिक आरोग्य यंत्रणा  तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.

 या महामारीला प्रतिसाद देण्यासाठी /मुकाबला करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर काम केले आहे. आम्ही  आपल्या लस  मैत्री(vaccine maitri) उपक्रमाद्वारे भारतात बनवल्या जाणार्‍या कोविड-19 च्या लसींचे वितरण 80 पेक्षा जास्त देशांमध्ये सामायिक करत असून जगभरातील लस वितरणातील असमानता दूर करण्याच्या  दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

 

‘वसुधैव कुटुंबकम ’ हे  भारताचे प्राचीन तत्वज्ञान संपूर्ण जगाला एकाच कुटुंबाच्या विशाल  रूपात पहात असते.

 

आम्ही यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे आणि आमच्या कृतीतून  ते प्रतिबिंबित होत  असते. जसजसे जग या तत्त्वज्ञानाला अधिकाधिक आत्मसात करत जाईल, तसतशी आपली प्रगती एका सुसंस्कृत आणि निरोगी जगाकडे वाटचाल करत जाईल.

 

आजच्या जागतिक आरोग्य दिन 2021 च्या निमित्ताने मी भारत सरकारच्या वतीने, सर्व नागरीक आणि समुदायाला आर्थिक त्रास सहन न करता आवश्यक असलेल्या गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळेस मिळण्याची खात्री देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनर्रुच्चार करतो आणि आपण पुनश्च  समान आरोग्यपूर्ण   जगाकडे वाटचाल करु अशी आशा व्यक्त करतो.

 

धन्यवाद आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी माझ्या शुभेच्छा!

***

MC/SP/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1710063) Visitor Counter : 541