उपराष्ट्रपती कार्यालय

आपली माता, मातृभाषा, मातृभूमी आणि मूळ स्थान नेहमी लक्षात ठेवा – उपराष्ट्रपती


न्यायालये आणि प्रशासनात मातृभाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचे केले आवाहन

यशस्वी लोकांनी त्यांच्या मूळ स्थानांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्याचा उपराष्ट्रपतींचा आग्रह

उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘नीलिमाराणी – माय मदर, माय हिरो’ या पुस्तकाचे विमोचन

Posted On: 02 APR 2021 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 एप्रिल 2021

 

प्रत्येक व्यक्तीने आपले मूळ लक्षात ठेवायची गरज असून  आपली माता, मातृभाषा, मातृभूमी आणि मूळ स्थान यांचा नेहमी आदर करणे या मुद्द्यांवर उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज भर दिला.

भुवनेश्वर येथील राज भवनात ‘नीलिमाराणी – माय मदर, माय हिरो’ या पुस्तकाचे विमोचन केल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करत होते. शिक्षण, न्यायालयीन कामकाज आणि प्रशासन यामध्ये मोठ्या प्रमाणावर मातृभाषेचा वापर व्हायला हवा असे आग्रही मत त्यांनी मांडले. ‘आदानप्रदान आणि काळजी’ घेण्याच्या खऱ्या उर्जेतून, सर्व यशस्वी स्त्री-पुरुषांनी त्यांच्या मूळ गावांना मदत करून पाठबळ द्यावे अशी विनंती त्यांनी केली.

प्रस्तुत पुस्तक म्हणजे लोकसभा सदस्य डॉ.अच्युत सामंत यांनी लिहिलेले त्यांच्या दिवंगत मातोश्री नीलिमाराणी यांचे जीवन चरित्र आहे. मातोश्रींचे जीवन आणि त्यांचा संघर्ष शब्दबद्ध केल्याबद्दल सामंत यांचे कौतुक करत नायडू म्हणाले की, एका मातेचे जीवनचरित्र प्रकाशित करणे हा अत्यंत हृद्य प्रसंग होता कारण बनविण्यात माता त्यांच्या संगोपनातून आणि उत्तम विचारांतून कोणत्याही स्त्री-पुरुषाचे थोर व्यक्तिमत्व घडवित असतात.

नीलिमाराणी यांना आदरांजली वाहताना उपराष्ट्रपती म्हणाले की अत्यंत टोकाची गरिबी आणि साधनांची कमतरता असताना देखील नीलिमाराणी यांनी त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळेल याकडे बारकाईने लक्ष दिले तसेच गरीब आणि पददलितांच्या उत्थानासाठी त्या सतत कार्यरत राहिल्या. तसेच त्यांनी त्यांच्या मुलांच्या मदतीने त्यांचे मूळ गाव कलराबंका हे  देशातील सर्वात पहिले स्मार्ट गाव म्हणून विकसित केले या गोष्टीबाबत उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. ही गोष्ट अत्यंत स्फूर्तीदायक असून, इतरांनी देखील नीलिमाराणी यांचे अनुकरण करायला हवे आणि आपल्या मूळ गावाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायला हवे असे ते म्हणाले.

ओदिशाचे राज्यपाल प्रा.गणेशी लाल आणि लोक सभा सदस्य अच्युत सामंत यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1709214) Visitor Counter : 157