कंपनी व्यवहार मंत्रालय
एमसीएने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 1.55 लाख कंपन्यांची नोंदणी नोंदवली, गेल्या वर्षाच्या तुलनेत 27 टक्के वाढ
Posted On:
01 APR 2021 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2021
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) 2019-20 वर्षातील 1.22 लाख कंपन्यांच्या तुलनेत 1.55 लाखाहून अधिक कंपन्यांची नोंदणी केली असून ही वाढ 27 टक्के आहे. त्याचप्रमाणे, गेल्या वर्षीच्या 36,176 च्या तुलनेत 42,186 मर्यादित जबाबदारी भागीदारी (एलएलपी) नोंदणी झाली, जी सुमारे 17% अधिक आहे. कोविड -19 साथीच्या आजारामुळे देशासमोर निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती पाहता ही वाढ लक्षणीय आहे.
केंद्र सरकारच्या व्यवसाय सुलभता मोहिमेचा एक भाग म्हणून, एमसीएने अनेक उपक्रम हाती घेतले ज्यायोगे भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी प्रक्रिया, वेळ आणि खर्च वाचला आहे. हितधारकांना कंपन्या आणि एलएलपी सुरु करणे शक्य व्हावे यासाठी लॉकडाऊन दरम्यानही केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी) कार्यरत राहिले.
एमसीएने फेब्रुवारी 2020 मध्ये एसपीआयसीई + फॉर्म सुरू केला आणि त्याद्वारे केंद्र सरकारच्या तीन मंत्रालये / विभागांमध्ये (कंपनी व्यवहार मंत्रालय, कामगार मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयातला महसूल विभाग) आणि तीन राज्य सरकारे (महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल ) यांच्यातील दहा वेगवेगळ्या सेवा एकत्र केल्या.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709082)
Visitor Counter : 181