इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

मार्च -2021 मध्ये 7.12 कोटी ई-वे बिले; गेल्या तीन वर्षातला एका महिन्यातला उच्चांक

Posted On: 01 APR 2021 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 एप्रिल 2021

 

जीएसटी व्यवस्थेअंतर्गत  ई-वे बिल प्रणालीने मार्च 2021 या महिन्यात 7.12 कोटी ई-वे बिले तयार करून नवीन मैलाचा दगड गाठला आहे. ई-वे बिल प्रणालीच्या मागील तीन वर्षांच्या प्रवासात कोणत्याही महिन्यात तयार झालेली ही  ई-वे बिलांची सर्वाधिक संख्या आहे.  त्याचप्रमाणे 24 मार्च  2021, रोजी  27.86 लाख ई-वे बिले तयार करण्यात आली , जी गेल्या तीन वर्षांतली  एका दिवसातली  सर्वाधिक संख्या आहे. गेल्या तीन  वर्षात एकूण 180.34 कोटी ई-वे बिले तयार झाली आहेत.

जीएसटी परिषदेच्या निर्देशानुसार ई-वे बिल प्रणाली 1 एप्रिल 2018 रोजी नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) सुरू केली होती. ई-वे बिल प्रणालीची सुरुवात  1 एप्रिल 2018 ते 16 जून 2018 या कालावधीत टप्प्याटप्प्याने झाली. ई-वे बिल प्रणालीने गेल्या तीन वर्षांत उच्च उपलब्धता कायम ठेवली आहे.

50,000 पेक्षा जास्त मूल्य असलेल्या  वस्तू एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी ई -वे बिल तयार करणे आवश्यक आहे. यामुळे विविध  राज्यांच्या ई-वे बिलाची आवश्यकता नाही.  ई-वे बिलामुळे मालवाहतुकीचा  वेळ कमी करण्यात मदत झाली आहे. तसेच राज्याच्या सीमेवरील तपासणी नाके हटवणे सुलभ झाले आहे आणि कर अनुपालन आणि कर संकलनात सुधारणा केली आहे.

कोविड -19 महामारीमुळे आवश्यक लॉकडाऊन दरम्यान, ई-वे बिल प्रणालीने देशातील विविध भागात अत्यावश्यक वस्तू आणि वैद्यकीय पुरवठ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सरकारी विभागांना अनेक अहवाल दिले आहेत.

Key Statistics from 01.04.2018 to 31.03.2021    

 

Number of E-Waybills generated

180.34 Crores

Number of Vehicles used

2.2 Crores

Number of Users logged in

37.6 Lakhs

Number of Consignors

35 Lakhs

Number of Consignees

77 Lakhs

Number of Transporters involved

0.92 Lakhs

Number of Verifications done by officers

7 Crores

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1709078) Visitor Counter : 204


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi