राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असून ते एम्समधील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहेत
Posted On:
27 MAR 2021 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2021
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना आज दुपारी (27 मार्च, 2021) दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे, जी 30 मार्च रोजी, मंगळवारी सकाळी होणे अपेक्षित आहे. राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर आहे आणि ते एम्समधील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
* * *
S.Tupe/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708099)
Visitor Counter : 245