युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021 मध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटात योगासन क्रीडा प्रकाराचा समावेश: किरेन रिजिजू
Posted On:
25 MAR 2021 4:46PM by PIB Mumbai
योगासन हा स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून विकसित करण्यासह संबंधित बाबी विचारात घेतल्यानंतर योगासनाला देशातील स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सर्वंकष विचारविनिमयानंतर राष्ट्रीय योगासन क्रीडा महासंघाला (एनवायएसएफ) राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे.
खेलो इंडिया युथ गेम्स 2021 मध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटात योगासन क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. सरकारची अधिकृत मान्यता एनवायएसएफला सर्व प्रकारात राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य करण्यास पात्र ठरते, उदा. ज्येष्ठ, कनिष्ठ आणि उप-कनिष्ठ आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग. सरकारच्या अधिकृत मान्यतेनंतर, प्रामुख्याने योगासनाच्या प्रचार-प्रसारासाठी आणि विकासासाठी काम करणाऱ्या एनवायएसएफची जबाबदारी आहे ती वार्षिक अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करणे आणि योगासनाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आणि संघांचा सहभाग सुनिश्चित करणे.
ही माहिती युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली.
***
Jaydevi PS/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707539)
Visitor Counter : 263