युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
नेमबाजी विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्यांना क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांच्या हस्ते पदके प्रदान, भारताच्या चमूमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक पदकाचे दावेदार खेळाडू असतील- रीजीजू यांनी व्यक्त केला विश्वास
Posted On:
24 MAR 2021 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2021
आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेत, आज कर्णी सिंग शूटिंग रेंज येथे महिलांच्या 25 मी पिस्तुल स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना बघण्यासाठी क्रीडा मंत्री किरेन रीजीजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेतील तिन्ही भारतीय महिला पदक विजेत्या नेमबाज, चिंकी यादव-सुवर्णपदक विजेती, राही सरनोबत- रौप्य पदक आणि मनु भाकेर-कांस्य पदक विजेती, यांना आज रीजीजू यांच्या हस्ते, पदके प्रदान करण्यात आली.
त्याआधी, आज, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर याने पुरुषांच्या 50 मिटर रायफल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या सर्व खेळाडूंच्या कामगिरीसह आजही भारताने या स्पर्धेच्या पदकतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखत नऊ सुवर्ण, पाच रौप्य आणि 5 कांस्य पदकांवर आपले नाव कोरले आहे.
रीजीजू यांनी या विश्वचषक स्पर्धेतील चमकदार कामगिरीबद्दल, सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. कोरोनाच्या टाळेबंदी नंतरची पहिलीच जागतिक स्पर्धा आहे. “या विश्वचषक स्पर्धेतील भारताची एकूण कामगिरी लक्षणीय ठरली आहे. या महामारीच्या काळातही आम्ही आमच्या नेमबाजांना प्रशिक्षणासाठी सर्व मदत केली आहे, त्यामुळे आमच्या त्यांच्याकडून अपेक्षाही आहेत”, असे रीजीजू म्हणाले.
क्रीडामंत्र्यांनी यावेळी भारतात नेमबाजीच्या विकासावरही भाष्य केले. भारत, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. भारताच्या नेमबाजी चमूसाठी हा एक महत्वाचा प्रवास आहे. काही वर्षांपूर्वी आपण केवळ मोजक्याच स्पर्धांमध्ये सहभागी होत असू, मात्र आता या क्षेत्रात भारताने आपला दबदबा निर्माण केला आहे. हा प्रवास अत्यंत रोमांचक आहे. आज आपल्या खेळाडूंना देशभर ज्या सुविधा मिळत आहेत, आणि खेळाविषयी एक प्रकारचा उत्साह देशभरातल्या खेळाडूंमध्ये दिसतो आहे, त्याला सरकारही सर्वतोपरी सुविधा देऊन मदत करत आहे, या सर्व प्रयत्नांचाच हा परिपाक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या नेमबाजांकडून ऑलिम्पिकमध्ये देशाच्या मोठ्या अपेक्षा आहेत, अस सांगत, आपल्या ऑलिम्पिक चमूमध्ये पदकाचे दावेदार असणारे अनेक खेळाडू असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंचा सर्वात मोठा चमू पाठवणार आहे, असेही रीजीजू म्हणाले.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707374)
Visitor Counter : 666