रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेमधील वारसा संरक्षण
प्रविष्टि तिथि:
24 MAR 2021 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2021
वाफेवर चालणाऱ्या इंजिनांची देखभाल, डोंगराळ भागातील रेल्वेचे जतन, डोंगराळ आणि वाफेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना, रेल्वे संग्रहालये बळकट करणे, इमारतींचे संरक्षण, कलाकृती, रेल्वे वारसास्थळांचे अंकेक्षण आणि ऑनलाईन प्रसारण इत्यादींचा समावेश असलेल्या मार्गदर्शक सूचना रेल्वे वारसा संवर्धनासाठी जारी करण्यात आल्या आहेत.
भारतीय रेल्वेची 21 रेल्वे संग्रहालये, 16 वारसा कलादालने आणि 9 वारसा उद्याने आहेत.
दार्जिलिंग हिमालयन रेल्वे (डीएचआर), नीलगिरी माउंटन रेल्वे (एनएमआर), कालका शिमला रेल्वे (केएसआर), माथेरान लाइट रेल्वे (एमएलआर) आणि कांगडा व्हॅली रेल्वे (केव्हीआर) अशा पाच डोंगराळ भागात असलेल्या रेल्वे आहेत. यापैकी डीएचआर, केएसआर आणि एनएमआर या तीन डोंगराळ भागातील रेल्वेना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे.
चलनीकरणासाठी डीएचआर, केएसआर, एनएमआर आणि एमएलआर या चार डोंगराळ भागातील रेलवेची निवड करण्यात आली आहे. या टप्प्यावर आउटसोर्सिंग केले नसल्यामुळे, तपशील उपलब्ध नाही.
रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग व ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री श्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1707283)
आगंतुक पटल : 111