राष्ट्रपती कार्यालय

जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येस राष्ट्रपतींचा संदेश

Posted On: 23 MAR 2021 7:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मार्च 2021

क्षयरोगाबद्दल जनजागृतीसाठी उद्या 24 मार्च 2021 रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा होत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.  याच दिवशी 1982 मध्ये डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाला कारण ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला होता.  त्यामुळे या रोगाचे निदान तसेच औषधोपचार शक्य झाले, असे दरवर्षी 24 मार्च रोजी असणाऱ्या  जागतिक क्षयरोग दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात म्हटले आहे.

वर्ष 2020 हे भारतासह जगातही आरोग्ययंत्रणांचे परीक्षा पहाणारे वर्ष ठरले. कोविड-19 महामारीने प्रत्येकापर्यंत पोहचू शकणाऱ्या दर्जेदार आरोग्यसेवेचे महत्व अधोरेखीत केले.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम हा कोविड-19 विरोधी लढ्यात अग्रभागी होता. त्यांचे कोविड महामारीशी लढण्यासोबतच  TB निर्मूलनासाठीचे प्रयत्न स्तुत्य आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास लक्ष्याचा भाग म्हणून ‘सार्वत्रिक आरोग्य’ हे लक्ष्य साधण्यासाठी भारत कटीबद्ध आहे. आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय आरोग्य विमा कार्यक्रमाच्या कक्षेत हे राबवले जात आहे.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाने अनेकविध अडचणींवर मात करत लक्षणीय मजल गाठली हे मला प्रशंसनीय वाटते. या प्रसंगी आपण ‘सर्वासाठी आरोग्य’ साधण्यासाठी प्रयत्न वाढवायला हवे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी उज्ज्वल आणि आरोग्यसंपन्न भविष्य निर्माण करायला हवे.,  असे त्यांनी संदेशात पुढे म्हटले आहे.

राष्ट्रपतींचे भाषण येथे वाचावे

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1707057) Visitor Counter : 170