विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
देशात मोठे सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी खुले भौगोलिक आणि अवकाश-आधारित रिमोट सेन्सिंग धोरण
प्रविष्टि तिथि:
22 MAR 2021 7:15PM by PIB Mumbai
जिओस्पेशियल डेटा अर्थात भू-स्थानिक डेटा धोरण खुले केल्यामुळे प्रत्येक क्षेत्राला फायदा होईल आणि देशातील प्रत्येक काना-कोपऱ्यापर्यंत याचे लाभ पोहचतील असे अवकाश विभागाचे सचिव, आणि अवकाश आयोगाचे अध्यक्ष डॉ. के शिवन यांनी अधोरेखित केले. ते विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सुवर्ण जयंती मालिकेमधील व्याख्यानमालेत बोलत होते.
"‘अनलॉकिंग इंडियाज स्पेस पोटेन्शियल’ या विषयावरील व्याख्यानमालेत त्यांनी मार्गदर्शन केले. “भौगोलिक डेटा उदारीकरण करणार्या नव्या मार्गदर्शक सूचना एक धाडसी आणि मळलेल्या वाटा पुसून पुढे जाणारे पाऊल आहे आणि विविध क्षेत्रांत ते क्षितिजे विस्तारणारे ठरेल” असे डॉ. शिवन म्हणाले.
राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संवाद परिषद (एनसीएसटीसी) आणि विज्ञान प्रसार यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत भू-स्थानिक डेटा आणि नकाशा आरेखन या विषयावर ते बोलत होते.
ते म्हणाले की अवकाश-आधारित रिमोट सेन्सिंग धोरणासह उदारीकृत भौगोलिक धोरण देशात नवीन सकारात्मक बदल घडून आणणारी ठरेल आणि हे पाऊल देशाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यात मोठी भूमिका बजावेल.

S.Tupe/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1706715)
आगंतुक पटल : 252