आयुष मंत्रालय

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि किरेन रीजीजू यांनी राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभ आणि ‘ शाश्वत विकास उद्दिष्ट -3 च्या पुर्तेतेसाठी आयुर्वेद या विषयावरच्या 26 व्या राष्ट्रीय चर्चा सत्राचे केले उद्घाटन

Posted On: 22 MAR 2021 6:41PM by PIB Mumbai

 

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि युवा आणि क्रीडा राज्य मंत्री किरेन रीजीजू यांनी राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभ आणि शाश्वत विकास उद्दिष्ट -3 च्या पुर्तेतेसाठी आयुर्वेद या विषयावरच्या राष्ट्रीय चर्चा सत्राचे विज्ञान भवन इथे उद्घाटन केले. आयुर्वेदातल्या मोलाच्या योगदानासाठी नामवंत वैद्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

हे चर्चा सत्र आयोजित केल्याबद्दल राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचे अभिनंदन करत हे अभिमानास्पद असल्याचे  श्रीपाद नाईक  यांनी सांगितले.आरोग्य सर्वासाठीहे शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे हे आपणा सर्वाना परिचित असल्याचे ते म्हणाले. सर्वांनी सुखी राहावे, सर्वे भवन्तु सुखिनः या संकल्पनेवर आयुर्वेदाचा विश्वास असून हे चर्चा सत्र ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांना आयुर्वेदाच्या क्षमतेबाबत  अधिक परिचय होण्यासाठी मदत होणार असल्याचे  त्यांनी सांगितले.आयुष हे  सरकारच्या प्राधान्य क्षेत्रापैकी एक असून गेल्या सहा वर्षात आयुष मंत्रालयाने लक्षणीय प्रगती केल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ या राष्ट्रीय आयुर्वेद अकादमीने 1991 पासून आपला प्रवास सुरु केला. अनोख्या गुरु- शिष्य शिक्षण पद्धतीतून वैद्यक विषयक कौशल्ये वृद्धिगत करण्याचा यामागचा उद्देश होता. गुरु कडून शिष्याकडे ज्ञान हस्तांतरित करण्यासाठी गुरुकुल हे प्रभावी माध्यम आहे. या प्राचीन पद्धतीत काही सुधारणा करत सध्याच्या काळात या परंपरेचे जतन करण्यात आले आहे. या पद्धतीद्वारे आतापर्यंत 1100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या विशेष ज्ञानाचा लाभ घेतला आहे.

शाश्वत विकास उद्दिष्ट -3 च्या पुर्तेतेसाठी आयुर्वेद या विषयावरच्या राष्ट्रीय चर्चा सत्रामुळे या विषयावर सखोल माहिती प्राप्त होणार आहे.   

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

 

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706707) Visitor Counter : 153


Read this release in: English , Urdu , Hindi