पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
तेल आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न
प्रविष्टि तिथि:
22 MAR 2021 2:48PM by PIB Mumbai
तेल आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोक सभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, नविकरणीय उर्जा त्याचबरोबर इथेनॉल,कॉम्प्रेस बायो गॅस, बायो डीझेल यासारख्या पर्यायी इंधनांसाठी प्रोत्साहन देत आहे. गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे वळण्यासाठी स्वच्छ इंधन म्हणून नैसर्गिक वायुला प्रोत्साहन, तेल शुद्धीकरण कारखाना प्रक्रिया सुधारणा, उर्जा क्षमता आणि संवर्धन यांना प्रोत्साहन, विविध धोरणा अंतर्गत देशात तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या धोरणामध्ये प्रोडक्शन शेअरिंग करार धोरण, हायड्रो कार्बन एक्सप्लोरेशन अँन्ड लायसन्सिंग पॉलिसी, राष्ट्रीय डाटा भांडाराची स्थापना यांचा समावेश आहे. राष्ट्रीय तेल कंपन्यांना कार्यात्मक स्वातंत्र्य आणि इलेक्ट्रोनिक एक खिडकी यंत्रणेसह मंजुरी प्रक्रिया सुटसुटीत करत खाजगी क्षेत्राचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यात येत आहे. तेलाची आयात कमी राहावी यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांशी समन्वय साधत काम करत आहे, असेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
S.Tupe/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1706584)
आगंतुक पटल : 382