राष्ट्रपती कार्यालय

भारताचे राष्ट्रपती आणि चिलीच्या अध्यक्षांचे टेलिफोनच्या माध्यमातून संभाषण

प्रविष्टि तिथि: 19 MAR 2021 8:50PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (19 मार्च 2021 रोजी) रिपब्लिक ऑफ चिलीचे अध्यक्ष सॅबॅस्तियन पिनेरा  एनिक यांच्याशी टेलिफोनवरून चर्चा केली.

राष्ट्रपतींनी यावेळी 2019 मध्ये चीली दौऱ्याची आठवण काढली. तसेच अध्यक्ष पिनेरा यांना त्यांच्या शिष्टमंडळाची उत्तम व्यवस्था केल्याबद्दल धन्यवाद दिले. दोन्ही नेत्यांनी या भेटीचा पाठपुरावा करण्याबाबत चर्चा केली, तसेच कोविड महामारीपश्चात द्विपक्षीय बंध भारत चीली प्रिफरेन्शियल व्यापार कराराच्या दुसऱ्या भागाचा समावेश करत अजून दृढ करण्यावर सहमती दर्शवली. अध्यक्ष पिनेरा यांनी भारताला भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केली.

भारत आणि चिली या देशांमधील व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील सहकार्याच्या संभाव्य परिमाणांचा  विचार करता असे द्विपक्षीय बंध विविध क्षेत्रात निर्माण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.

राष्ट्रपती कोविंद यांनी चिलीच्या जनतेला उत्तम आरोग्य व संपन्नतेच्या शुभेच्छा दिल्या.

****

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1706159) आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी