रेल्वे मंत्रालय

पहिला वातानुकूलित  थ्री टियर इकॉनॉमी क्लास डबा प्रवाशांच्या सेवेत

Posted On: 19 MAR 2021 5:46PM by PIB Mumbai

 

रेल्वे कोच फॅक्टरी/कपूरथलाने अलिकडेच पहिला प्रोटोटाइप लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लासचा डबा सादर केला आहे.  याची  चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

एलएचबी एसी थ्री-टियर कोचचे हे नवीन रूप आहे , ज्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: -

  • पॅसेंजर डेकवर सुटसुटीत इलेक्ट्रिकल पॅनेल्समुळे प्रवाशांना वापरासाठी अतिरिक्त  जागा उपलब्ध
  • 83 बर्थमुळे  प्रवासी क्षमता वाढली.
  • दिव्यांगजनांना व्हीलचेयरवरून  प्रवेश करता येईल  असे सक्षम प्रवेशद्वार व डब्यांची रचना तसेच सुगम्य भारत अभियानाच्या निकषांचे  पालन करून व्हीलचेयर प्रवेशासह दिव्यांगजन -स्नेही शौचालयाची तरतूद.
  • सर्व बर्थसाठी स्वतंत्र वातानुकूलन फटीच्या माध्यमातून  एसी डक्टिंग.
  • आरामदायी, कमी वजन आणि उच्च देखभाल योग्य सीट आणि बर्थचे मॉड्यूलर डिझाइन.
  • लॉंजिट्यूडिनल आणि ट्रान्सव्हर्स बे अशा दोन्ही मध्ये   फोल्डेबल स्नॅक टेबल्सच्या स्वरूपात सुधारित प्रवासी सुविधा, इजामुक्त जागा आणि पाण्याच्या बाटल्या, मोबाइल फोन आणि मासिके ठेवण्यासाठी होल्डर्स
  • प्रत्येक बर्थसाठी वाचनासाठी  वैयक्तिक  दिवे आणि मोबाइल चार्जिंग पॉईंट्स.
  • मधल्या आणि वरच्या  बर्थवर प्रवेश करण्यासाठी शिडीची अर्गोनॉमिकली सुधारित रचना.
  • भारतीय आणि पाश्चात्य शैलीच्या प्रसाधनगृहांची  सुधारित रचना .
  • नेटके  आणि कार्यक्षम  प्रवेशद्वार
  • लुकलुकणाऱ्या  बर्थ क्रमांक आणि  नाईट लाइटसह  बर्थ इंडिकेटर.
  • जागतिक निकषांची पूर्तता करुन सुधारित अग्निसुरक्षा मानक

हे एलएचबी इकॉनॉमी क्लासचे डबे आवश्यक मंजुरीनंतर  एलएचबी कोचसह चालणार्‍या सर्व मेल / एक्स्प्रेस गाड्यांमध्ये (राजधानी, शताब्दी, दुरंतो आणि जन शताब्दी वगैरे विशेष गाड्या वगळता ) समाविष्ट केले जातील.

रेल्वे, वाणिज्य व उद्योग व ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, पियुष  गोयल यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या  लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706105) Visitor Counter : 206


Read this release in: English , Urdu , Punjabi