महिला आणि बालविकास मंत्रालय

कोविड-19 महामारीपश्चात आरोग्यसेवा सुधारणेसाठी उपाययोजना

Posted On: 18 MAR 2021 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मार्च 2021


स्त्रिया व बालकांमधील पोषणमूल्यांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून लाभार्थींच्या विविध वर्गांसाठी आंगणवाडी सेवा व पौगंडावस्थेतील मुलींसाठी सरकार पुरवणी पोषण कार्यक्रम लागू करत असते.  कोविड-19 महामारी काळात आंगणवाडी लाभार्थींना सलग पोषण मिळण्याच्या उद्देशाने 15 दिवसातून एकदा आंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लाभार्थींच्य़ा घरी पोषक आहार पोचवावा म्हणून योग्य पावले उचलण्याचे निर्देश राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले गेले होते.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘कोविड-19 दरम्यान व पश्चात प्रजननक्षम, गरोदरावस्थेतील स्त्रिया, नवप्रसवा व बालके यांचे आरोग्य व पोषण (RMNCAH+N) सेवा‘ यावर मार्गदर्शक सूचनापत्र राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना जारी केले होते.  तीव्र अतिसार  नियंत्रण पंधरवडा (IDCF), राष्ट्रीय कृमीनाशक दिन (NDD), व अशक्तपणा यासाठी जीवनसत्व पुरवठा मोहिम आखण्याचे तसेच स्थानिक स्थितीनुसार आवश्यक सेवा वा माल घरपोच पोचवण्यासाठी  पर्यायी यंत्रणा उभारण्याचे  निर्देश यात दिले होते.

ग्रामीण आरोग्य, स्वच्छता व आरोग्य पोषण दिन यासारख्या सुधारीत योजनांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्य़ांनी बफर झोनच्या बाहेरील प्रदेशांमध्ये व ग्रीन झोनमध्ये गृहभेटी देणे या सूचना करण्यात आल्य़ा होत्या. कंटेनमेंट व बफर झोनमध्ये कोविड कर्मचाऱ्यांनी नियमित भेट देणे , कन्टेनमेंट विभागात IFA, ORS, कॅल्शियम आणि झिंक यासारखी आवश्यक औषधांचा घरी पुरवठा करणे याचाही यात समावेश होता. आवाक्यातील महत्वपूर्ण सेवा पोहोचवणे, अशक्तपणा, पोषणमूल्ये पुनर्वसन सेवा केंद्र(NRCs), विशेष नवजात शिशू केअर विभाग (SNCUs), अतिसार नियंत्रण , NDD and IYCF सेवा देणे तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी वेबिनारचे आयोजन करण्यासंबधी विशेष दिशानिर्देश दिले गेले.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहीती दिली.


* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1705846) Visitor Counter : 103


Read this release in: English , Urdu , Telugu